नाशिक : पाण्याच्या नळ कनेक्शनसाठी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणारे चांदवड तालुक्यातील अहिरखेडे - पिंपळगाव धाबळी येथील ग्रामसेवक रामनाथ तुळशीराम कदम व शिपाई तुकाराम पुंजाराम पवार या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़३१) रंगेहाथ पकडले़पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी गावातील आदिवासी वस्तीमध्ये अहिरखेडे-पिंपळगाव धाबळी ग्रुप ग्रामपंचायततर्फे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आलेली आहे़ या पाण्याच्या टाकीतून आदिवासी वस्तीतील कुटुंबियांना पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही़ ग्रामसेवक कदम यांच्याकडे तक्रारदारांनी या टाकीतून नळ कनेक्शन मिळावे अशी विनंती केली असता प्रत्येक नळ कनेक्शनसाठी कदम यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली़ याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने तक्रारीवरून मंगळवारी सापळा आयोजित केला असता ग्रामसेवक रामनाथ कदम याने तक्रारदारांकडून नळ कनेक्शनसाठी तीन हजार रुपयांची मागणी करून ही रक्कम शिपाई तुकाराम पवार यांच्याकडे देण्यास सांगितली़ त्यानुसार पवार यांनी ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारदारांकडून लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत ग्रामसेवक कदम व शिपाई पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
पिंपळगाव धाबळी ग्रामपंचायतच्या लाचखोर ग्रामसेवकासह शिपायास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 18:55 IST
नाशिक : पाण्याच्या नळ कनेक्शनसाठी तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारणारे चांदवड तालुक्यातील अहिरखेडे - पिंपळगाव धाबळी येथील ग्रामसेवक रामनाथ तुळशीराम कदम व शिपाई तुकाराम पुंजाराम पवार या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़३१) रंगेहाथ पकडले़पोलीस उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार चांदवड तालुक्यातील पिंपळगाव धाबळी गावातील ...
पिंपळगाव धाबळी ग्रामपंचायतच्या लाचखोर ग्रामसेवकासह शिपायास अटक
ठळक मुद्देचांदवड तालुका : अहिरखेडे - पिंपळगाव धाबळी ग्रामपंचायतनळ कनेक्शनसाठी प्रत्येक तीन हजार रुपयांची मागणी