रा ज्याच्या राजकारणातील बडे प्रस्थ अशी ओळख असणारे छगन भुजबळ व महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची आस दाखविणारे तरुण नेते राज ठाकरे या दोघांचेही प्रभावक्षेत्र म्हणून नाशिककडे पाहिले जात असले, तरी यंदा विधानसभेच्या उमेदवारीसाठी मात्र या दोघांपेक्षा शिवसेना-भाजपा महायुतीच्याच तिकीट खिडकीवर गर्दी असल्याचे चित्र आहे.
1985 च्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा शरद पवार यांच्या झोळीत टाकण्याचा अपवाद वगळता त्यापूर्वी अगर त्यानंतरही कधी नाशिक जिल्ह्यातील मतदारांनी कुणा एका पक्षाचे वर्चस्व निर्माण होऊ दिलेले नाही. सद्य:स्थितीत पक्षीय बलाबलाचा विचार करता राष्ट्रवादी व मनसे या दोघांपेक्षा अवघ्या एका जागेने जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या शिवसेनेत स्वाभाविकच ‘भरती’ प्रक्रिया मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. यात सिन्नरमध्ये राजाभाऊ वाजे व येवल्यात संभाजी पवार यांनी भगवा हाती घेतल्याने अनुक्रमे कॉँग्रेसचे अॅड. माणिकराव कोकाटे व राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचा अगदी कालर्पयत निर्धोक मानला जाणारा मार्ग काहीसा अवघड ठरण्याचे आडाखे बांधले जात आहेत. ‘तुमची इच्छा असेल तरच लढतो’ अशी भुजबळांकडून केली जाणारी भाषा या आडाख्याला दुजोरा देणारीच ठरली आहे. शिवसेनेच्या चौघा विद्यमान आमदारांपैकी तिघांची उमेदवारी निश्चित आहे.
मात्र बबन घोलप यांना अवैध संपत्ती प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविल्याने त्यांच्याऐवजी त्यांचे पुत्र योगेश यांचे राजकीय मार्केटिंग सध्या सुरू आहे. भाजपाचे जिल्ह्यातील एकमेव आमदार उमाजी बोरसे हे गतकाळातील त्यांच्या बंधूंप्रमाणोच निष्प्रभ ठरल्याने बागलाणमध्ये भाजपाकडून नवा चेहरा पुढे येण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात छगन भुजबळ व त्यांचे पुत्र पंकज यांच्याकडे असलेल्या दोन जागांव्यतिरिक्त राष्ट्रवादीकडे जी एक तिसरी जागा आहे, तिचे प्रतिनिधित्व ज्येष्ठ नेते ए. टी. पवार करतात. माजी मंत्री असलेले ‘ए.टी.’ यंदा नवव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी उत्सुक आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी असलेल्या सौ. जयश्री व लोकसभेसाठी उमेदवारी करून पराभूत झालेल्या डॉ. भारती या त्यांच्या दोन्ही स्नुषा व मुले अशा घरातल्याच अन्य इच्छुकांशी ‘ए.टीं.’ची तिकिटासाठी स्पर्धा आहे. त्यामुळे अगोदर घरातच समझौता करा, असे सांगण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली आहे.
गेल्यावेळी मनसेचे तीन आमदार निवडून गेल्याने नाशिकला ‘राजगढ’ संबोधले जाते. परंतु यंदाही या पक्षापुढे दोन-चार अपवाद वगळता सुयोग्य उमेदवारांची चिंता आहेच. नाशिक मध्यमधून वसंत गिते व नाशिक (पश्चिम) मधून नितीन भोसले या दोघा विद्यमान आमदारांच्या उमेदवा:या निश्चित असून, आमदार उत्तमराव ढिकले यांनी स्वत:हून थांबण्याचा निर्णिय घोषित केला आहे. त्यामुळे पंचवटीसह अन्य ठिकाणी आघाडी व महायुतीकडून ‘उपेक्षित’ ठरलेल्यांच्याच बळावर हा पक्ष निवडणुकीला सामोरे जाऊ शकेल, असे आजचे चित्र आहे.
मालेगावमधील मौलाना मुफ्ती मोहंमद यांची उमेदवारीही निश्चित आहे. कॉँग्रेसचे माजी आमदार शेख रशीद वा त्यांचे पुत्र माजी महापौर आसिफ शेख यांच्याशी त्यांचा सामना होणो अपेक्षित आहे.
पण हैदराबादचे वादग्रस्त खासदार असदुद्दीन ओवेसी मध्यंतरी मालेगावी येऊन तेथील काही मौलानांशी व गात्रे थकलेले जनता दल नेते निहाल अहमद यांच्याशी चर्चा करून गेले असल्याने धर्मकारणाचा पगडा असलेल्या या शहरातील मुस्लीम नेत्यांमध्येच स्पर्धा झालेली पाहावयास मिळेल.
1समीर भुजबळांची खासदारकी खालसा झाल्याने पंकजऐवजी ते नांदगावमधून लढतात की नाशिक (मध्य)चा पर्याय स्वीकारतात, यासंबंधीचा निर्णय होणो औत्सुक्याचे ठरले आहे.
2गेल्या वेळी विधानसभेच्या 15 पैकी 1क् जागा लढवूनही राष्ट्रवादीला तीनच जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे त्यांच्या प्रभावाचा दावा खोडून काढत कॉँग्रेसने किमान दोन जास्तीच्या जागांची मागणी चालवली आहे.
3जे. पी. गावित यांनी पेठ-सुरगाण्यातून सहा वेळा निवडून जात जिल्ह्यातील माकपाचे अस्तित्व टिकवून ठेवले होते. पण 2क्क्9 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत सुरगाणा मतदारसंघ नामशेष झाला़ त्यामुळे माकपाचे प्रतिनिधित्वही संपुष्टात आले.