शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या आयुक्तांची कसोटी

By admin | Updated: January 22, 2015 02:03 IST

महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता सुमारे ८४ कोटींच्या निधीची जमवाजमव करण्यात आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची मोठी कसोटी लागणार आहे.

नाशिक : सुमारे सहा तास महासभेत काथ्याकूट केल्यानंतर नगरसेवकांनी २० लाखांऐवजी ५० लाख रुपयांचा नगरसेवक निधी पदरात पाडून घेण्यात यश मिळविले असले, तरी महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता सुमारे ८४ कोटींच्या निधीची जमवाजमव करण्यात आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची मोठी कसोटी लागणार आहे. चालू आर्थिक वर्षातील शेवटच्या दोन महिन्यांतच १२७ नगरसेवकांच्या विविध विकासकामांबाबतच्या फायली हातावेगळ्या करण्यासाठी आयुक्तांसह प्रशासनालाही आता ‘ओव्हरटाइम’ करावा लागण्याची शक्यता आहे. महासभेने सुचविलेला एक कोटीचा नगरसेवक निधी आयुक्तांनी अवघ्या वीस लाखांवर आणून ठेवल्याने नगरसेवकांनी मंगळवारी जाब विचारला. त्यानंतर महासभेत सुमारे सहा तास चाललेल्या चर्चेत महापौर अशोक मुर्तडक यांनी प्रत्येक सदस्याला ५० लाख रुपये नगरसेवक निधी घोषित करत सद्यस्थितीत निविदा काढलेल्या कामांचे कार्यादेशही देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. १२७ नगरसेवकांना प्रत्येकी ५० लाखांप्रमाणे एकूण ६३ कोटी ५० लाख आणि निविदाप्रक्रिया पूर्ण परंतु कार्यादेश बाकी यासाठी सुमारे २० कोटी रुपये असे एकूण सुमारे ८४ कोटी रुपयांच्या निधीची जमवाजमव करण्याचे आव्हान आयुक्तांपुढे आहे. या कामांची तरतूद चालू आर्थिक वर्षातील सुधारित अंदाजपत्रकातच करावी लागणार असून, मार्चअखेर कामांच्या फायलींचा निपटरा करणे भाग पडले आहे. सध्या शहरात २७५ कोटींची कामे सुरू असल्याने त्यांचीही बिले देयकांसाठी प्रतीक्षेत आहेत, तर निविदा कार्यवाहीत परंतु स्थायीची मंजुरी बाकी असलेल्या १३० कोटींच्या कामांचेही दडपण प्रशासनावर आहे. त्यातच सिंहस्थाची कामे मार्गी लावण्याचे आव्हान असणार आहे. (प्रतिनिधी)च्दोन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारणाऱ्या आयुक्तांच्या टेबलावर सुमारे १,८६१ फायली स्वाक्षरीअभावी पडून होत्या. आयुक्तांनी दैनंदिनसर्व कामकाज सांभाळत रात्री उशिरापर्यंत महापालिकेत थांबत आतापर्यंत १,१०० च्यावर फाईली हातावेगळ्या केल्या. च्आता महासभेने ५० लाखांचा निधी घोषित केल्यानंतर पुढील दोन महिन्यांत आयुक्तांच्या टेबलावर विकासकामांच्या फायलींचा ढीगच साचणार आहे. त्यामुळे आयुक्तांबरोबरच अधिकाऱ्यांनाही ‘ओव्हरटाइम’ करावा लागेल.