शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Narendra Modi: ११ डिसेंबरला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; दोन मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 15:25 IST

मुंबई-नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या ५५ हजार ३३५ कोटी रुपये खर्चाच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी रस्ते विकास महामंडळाने विविध १३ राष्ट्रीयीकृत बँकांकडून तब्बल २८ हजार कोटींचे कर्ज घेतले गेले आहे.

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर निघाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपुरात उद्घाटन होणार आहे. याचवेळी नागपूर मेट्रोच्या रिच-२ (कामठी मार्ग) व रिच-४ (सेंट्रल एव्हेन्यू) या मार्गांचेदेखील उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची मागील अनेक महिन्यांपासून प्रतिक्षा होती. त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग तयार असतानादेखील सुरू होत नसल्याने जनतेतूनच प्रश्न उपस्थित होत होते. जानेवारी महिन्यात पंतप्रधान इंडियन सायन्स कॉंग्रेसच्या उद्घाटनासाठी नागपुरात येणार आहेत. तेव्हाच हे उद्घाटन होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ११ डिसेंबरच्या तारखेला पंतप्रधानांकडून होकार देण्यात आला आहे.महा मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नागपुरला येण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ नागपूर आणि पुणे मेट्रो तेच नाशिक मेट्रो निओच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्याची दाट शक्यता आहे. उद्घाटनाअगोदर नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग पूर्णत: तयार होईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष सह व्यवस्थापकीय संचालक (व्हीसीएमडी) राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले.

तीन आठवड्यात दोनदा नागपूर दौरा

समृद्धी व मेट्रोच्या उद्घाटनाच्या तारखेने अधिकाऱ्यांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान ३ जानेवारीला नागपुरात येणार आहेत. त्यावेळी समृद्धी आणि नागपूर मेट्रो सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी तीन आठवड्याच्या कालावधीत दोनदा शहरात येण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पंतप्रधान नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टच्या फुटाळा येथील म्युझिकल फाऊंटनचे लोकार्पण करणार नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकांसाठी खुला करण्यापूर्वी ते आणखी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग