शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 21:40 IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.

Narendra Modi on Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशाने भाजपमध्ये आनंदाची लाट आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. 'महाराष्ट्रात सुशासनाचा, सत्याचा विजय झाला आहे. देशात अन्य ठिकाणी देखील पोटनिवडणुका झाल्या. सर्वच राज्यांत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. देश फक्त आणि फक्त विकासाची मागणी करत आहे. मी देशाच्या जनतेचे आभार मानतो,' असं मोदी म्हणाले. 

महाराष्ट्रातील विजयाबद्दल बोलताना पीएम मोदी म्हणतात, 'महाराष्ट्रात सुशासनाचा विजय झाला आहे. महाराष्ट्रात खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे. आज महाराष्ट्रात लबाडी आणि फसवणूक पूर्णपणे पराभूत झाली आहे. राज्यात विकासाचा विजय झाला आहे. मी एकनाथ शिंदे, माझे परममित्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन करतो. आज अनेक राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकालही आले आहेत. आमची लोकसभेची जागाही एकाने वाढली आहे. यूपी, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये लोकांनी भाजपला जोरदार पाठिंबा दिला आहे. आसामच्या जनतेने पुन्हा एकदा भाजपवर विश्वास व्यक्त केला आहे. मध्य प्रदेशातही आम्हाला यश मिळाले आहे. बिहारमध्येही एनडीएचा पाठिंबा वाढला आहे. देशाला आता फक्त विकास हवा आहे, हे यावरून दिसून येते. महाराष्ट्रातील मतदार, माता, भगिनी आणि युवक, शेतकरी बंधू-भगिनी आणि देशातील जनतेला मी आदरपूर्वक वंदन करतो.' 

महाराष्ट्राने सर्व विक्रम मोडले'महाराष्ट्राने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कोणत्याही पक्षाचा किंवा आघाडीचा गेल्या 50 वर्षांतील हा सर्वात मोठा विजय आहे. सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राने भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडीला आशीर्वाद देऊन विजयी केले आहे. महाराष्ट्रात भाजप हा सलग तिसऱ्यांदा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. हे निश्चितच ऐतिहासिक आहे. भाजपच्या शासनप्रणालीवर हा शिक्कामोर्तब आहे. महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेस आणि त्यांच्या सर्व मित्रपक्षांपेक्षा एकट्या भाजपला जास्त जागा दिल्या आहेत. यावरून असे दिसून येते की, सुशासनाचा विचार केला तर देशाचा विश्वास फक्त भाजप आणि एनडीएवर आहे,' असंही मोदी यावेळी म्हणाले.

सलग तिसऱ्यांदा भाजपला जनादेश'सलग तीन वेळा भाजपला जनादेश देणारे महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य आहे. याआधी आम्ही गोवा, गुजरात, छत्तीसगड, हरियाणा आणि मध्य प्रदेशात सलग तीन वेळा विजय मिळवला आणि बिहारमध्येही एनडीएला सलग तीन वेळा जनादेश मिळाला आहे. 60 वर्षांनंतर तुम्ही मला तिसऱ्यांदा संधी दिली आहे, यावरुन आमच्या सुशासनाच्या मॉडेलवर जनतेचा विश्वास असल्याचे सिद्ध होते. मी जनतेला आश्वासन देतो की, आमचे सरकार महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करत राहील. महाराष्ट्रातील जमिनीवर काम करणाऱ्या NDA कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे,' अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Narendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस