नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण - विरेंद्र तावडेला २० जूनपर्यंत सीबीआय कोठडी

By Admin | Published: June 16, 2016 02:07 PM2016-06-16T14:07:59+5:302016-06-16T14:27:59+5:30

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या विरेंद्र तावडेला २० जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

Narendra Dabholkar murder case: Virendra Tawde to be confined in CBI custody till June 20 | नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण - विरेंद्र तावडेला २० जूनपर्यंत सीबीआय कोठडी

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण - विरेंद्र तावडेला २० जूनपर्यंत सीबीआय कोठडी

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. १६ - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या विरेंद्र तावडेला २० जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने गुरुवारी तावडेला शिवाजीनगर कोर्टात हजर केले. मागच्यावेळी त्याला १६ जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. 
 
आज मुदत संपत असल्याने त्याला पुन्हा हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला आणखी चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी तावडेला मागच्या शुक्रवारी सीबीआयने अटक केली. या प्रकरणात झालेली पहिली अटक आहे. पनवेलजवळील कळंबोली येथे तावडेचा दवाखाना आहे. तावडे याचे पनवेलजवळील सनातनच्या आश्रमाजवळच कल्पतरू सोसायटीमध्ये घर आहे. तो हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता आहे.  
 
१ जून रोजी सीबीआयने पुण्यातील सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरावर छापे टाकले होते. पुण्याच्या सीबीआय न्यायालयातून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर तावडे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये काही संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला होता. तसेच अकोलकर आणि तावडे या दोघांचा ई-मेलवरून संपर्क होता, असे तपासात दिसून आले होते.  छाप्यानंतर सीबीआयकडून तावडेला चौकशीसाठी बोलावण्यात येत होते.  
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मारेक-यांना शोधण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने आपला तपास अधिक तीव्र करताना मागील वर्षी दोन संशयितांची रेखाचित्रे जाहीर केली होती. 
 
 
 
 

Web Title: Narendra Dabholkar murder case: Virendra Tawde to be confined in CBI custody till June 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.