शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

नारायण राणे आत्मचरित्रातून करणार गौप्यस्फोट! १० एप्रिल रोजी प्रकाशन : शिवसेना, काँग्रेसवर लक्ष्यभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 03:23 IST

काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले व भाजपा प्रवेशाचेद्वार उघडण्याची प्रतीक्षा करीत असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले असून वाढदिवशी (१० एप्रिल रोजी) त्याचे प्रकाशन होणार आहे.

संदीप प्रधान मुंबई : काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले व भाजपा प्रवेशाचेद्वार उघडण्याची प्रतीक्षा करीत असलेले ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आत्मचरित्र लिहायला घेतले असून वाढदिवशी (१० एप्रिल रोजी) त्याचे प्रकाशन होणार आहे. या आत्मचरित्रात शिवसेना व काँग्रेसमधील अनेक घडामोडींबाबत गौप्यस्फोट केले जाण्याची शक्यता आहे. राजकारणातील व्यक्तीला सर्वच सत्य उघड करता येत नसले तरी वास्तवाशी जास्तीतजास्त प्रामाणिक राहण्याचा आपला प्रयत्न राहील, असे राणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.गेल्या काही दिवसांपासून आपण आत्मचरित्राचे लेखन सुरू केले असून दररोज सकाळी उठून दीड ते दोन तास लेखन करीत आहे. बालपणापासून ते आतापर्यंतचा जीवनपट मांडण्यात येणार आहे. अनेक राजकारणी सिद्धहस्त लेखकांकडून आत्मचरित्र लिहून घेतात. मात्र मी स्वत:च लेखन करायचे ठरवले आहे. कालांतराने आत्मचरित्राला आकार प्राप्त झाल्यावर त्यावर संपादकीय संस्कार करण्याकरिता परिचित लेखक, पत्रकारांची मदत घेणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.राणे यांची सुरुवात चेंबूरमधील राजकारणापासून झाली. ‘आपण शिवसेनेत आलो नसतो तर कदाचित आपला एन्काउंटर झाला असता,’ अशी भावना खुद्द राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा जाहीरपणे व्यक्त केली होती. कोकणातील गरीब कुटुंबातून मुंबईत आलेला तरुण शिवसेनेकडे आकृष्ट झाला व हळूहळू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकट गेला. राज्यात शिवसेना-भाजपा युतीची सत्ता असताना राणे यांनी मुख्यमंत्री होण्याकरिता प्रयत्न केले. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यातील मुरब्बी राजकारण्याने त्यांच्यावर मात केली. मात्र अखेर जोशी यांच्या जावयाचे पुण्यातील टॉवरचे प्रकरण उघड झाले आणि त्यांना पद गमवावे लागले. राणे हे जेमतेम सहा महिन्यांकरिता मुख्यमंत्री झाले. युतीचे सरकार असताना गाजलेल्या रमेश किणी हत्या प्रकरणानिमित्ताने शिवसेनेत रंगलेल्या राजकारणावरही हे पुस्तक भाष्य करील, अशी शक्यता आहे. १९९९मध्ये मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा भाजपाचा आग्रह, युतीचा पराभव व पुन्हा सरकार स्थापन करणे शक्य होत असतानाही भाजपा नेत्यांनी केलेली दिरंगाई यावर राणे यांच्या आत्मचरित्रातून प्रकाश पडू शकेल.विधानसभेच्या २००४मध्ये झालेल्या निवडणुकानंतर निकालाच्या आदल्या दिवशी ‘मातोश्री’वरून शिवसेना उमेदवारांना केले गेलेले दूरध्वनी व उद्धव ठाकरे यांचेच नाव मुख्यमंत्रीपदाकरिता सुचवण्याचा झालेला प्रयत्न याबाबतही अधिक तपशील यातून उघड होऊ शकेल. त्यानंतर उद्धव व राणे यांच्यात आलेले वितुष्ट, ‘शिवसेनेत पदांचा बाजार सुरू असल्याचे’ वक्तव्य रंगशारदा सभागृहातील पक्षाच्या बैठकीत करून बाळासाहेबांची ओढवलेली नाराजी आणि शिवसेनेतून झालेली हकालपट्टी या घडामोडींतील घालमेल आत्मचरित्रात प्रकट होईल, असे सांगण्यात येते.तरुण पिढीच्या मार्गदर्शनासाठी-कोकणातील सामान्य कुटुंबातून लहानाचा मोठा झालेला मुलगा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचला. शून्यातून त्याने सारेकाही उभे केले. या काळात जी सामाजिक, राजकीय व व्यावसायिक स्थित्यंतरे पाहिली त्यातून तरुण पिढीला मार्गदर्शन मिळावे या हेतूने आत्मचरित्र लिहीत आहे. -आ. नारायण राणे, काँग्रेस नेते

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे