खडकी : नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच आहेत. ते कोठे जातील असे वाटत नाही. तशी काही चर्चा नाही. अशा चर्चा होतच असतात. त्यामुळे या विषयावर बोलणे योग्य नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी खडकी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.गणेशोत्सवाचे औचित्य साधून चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी गाठीभेटी घेण्यासाठी खडकीतील नवा बाजार मित्र मंडळ, मित्र सागर मित्र मंडळ, डेपोलीन मित्र मंडळ आणि विशाल मित्र मंडळांना भेट दिली.त्यानंतर खडकीचे माजी उपाध्यक्ष, नगरसेवक मनीष आनंद यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.मेळाव्यास प्रदेश युवक अध्यक्ष विश्वजित कदम, पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, आमदार शरद रणपिसे, शहर युवक अध्यक्ष विकास लांडगे, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, कँटोन्मेंटच्या नगरसेविका पूजा आनंद आदी उपस्थित होते.चव्हाण यांनी पदाधिकाºयांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचे म्हणने जाणून घेतले आणि पुढच्या तयारीला लागण्याबाबत सूचना केल्या. त्याचप्रमाणे विविध समाजातील नागरिकांशी, तसेच व्यापाºयांशी, विविध क्षेत्रांतील नागरिकांची भेट घेऊन, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.मनीष आनंद यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर पूजा आनंद यांनी आभार मानले.
नारायण राणे अजूनही काँग्रेसमध्येच , ते कोठे जातील असे वाटत नाही : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:16 IST