शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane On Shivsena: शिवसेना नेते एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल'; नारायण राणे यांनी केले सूचक वक्तव्य, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 09:54 IST

पिंपरी-चिंचवड शहरात फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांशी बोलले.

पिंपरी :

काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काम करत नसल्याने त्यांच्या आमदारावर त्यांचा अंकुश राहिलेला नाही. म्हणूनच काँग्रेसच्या उमेदवाराचा विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली.

पिंपरी-चिंचवड शहरात फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांशी बोलले. विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबाबत राणे यांनी विरोधकांवर टीका केली. काँग्रेसचे काय राहिले आहे, ना देशात ना महाराष्ट्रात. काँग्रेस संकुचित पावत आहे. त्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही. देशात कोणत्याही प्रकारचं काम कार्य त्यांचे कार्यकर्ते व नेते करीत नाहीत आणि म्हणूनच त्यांच्या आमदारांवर त्यांचा अंकुश नसल्यामुळे त्यांचा पराभव झाला. 

एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात?शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते भाजपच्या संपर्कात आहेत का, असे विचारले असता राणे म्हणाले, ''असं सांगायचं नसतं, मग नॉट रिचेबल राहून काय उपयोग''. महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणणार का, असे विचारले असता राणे म्हणाले, "एक दिवस तरी मुख्यमंत्र्यांना स्वस्थ काढू द्या ना".

एकनाथ शिंदेसह १३ आमदार सूरतमध्ये!मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील १३ आमदार देखील असल्याचे सांगण्यात येत आहे. ते सध्या गुजरातच्या सूरतमधील मेरेडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि गुजरात भाजपाच्या नेत्यांनीही शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Eknath Shindeएकनाथ शिंदे