शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
4
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
5
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
6
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
7
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
8
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
9
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
10
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
11
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
12
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
13
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
14
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
15
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
16
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
17
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
18
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
20
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...

उरणमध्ये सोन्याचा मुलामा असलेला नारळ समुद्राला अर्पण करून केला नारळी पौर्णिमा उत्सव साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 21:22 IST

मधुकर ठाकूर उरण : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यावर्षीही करंजा- मोरा येथील कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला.यावेळी कोळी बांधवांनी ...

मधुकर ठाकूर

उरण : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यावर्षीही करंजा- मोरा येथील कोळी बांधवांनी नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला.यावेळी कोळी बांधवांनी सोन्याचा मुलामा असलेला नारळही समुद्राला अर्पण केला.

मागील अनेक वर्षांपासून नारळी पौर्णिमेचा सण करंजा- मोरा येथील मच्छीमार पारंपारिक पध्दतीने उत्साहात साजरा करतात.करंजा येथील द्रोणागिरी हायस्कूलमध्ये नारळाच्या प्रतिकृतीला सोन्याचा मुलामा देऊन सजविण्यात येते. यावेळी महिला, कोळी बांधव,विद्यार्थी पारंपारिक कोळी वेशभुषा परिधान करून उत्सवात सामील होतात.पारंपारिक कोळी गाण्यांवर नृत्य सादर करतात.पारंपारिक कोळी संस्कृतीचे दर्शन घडवितात.त्यानंतर नारळाच्या प्रतिकृतीची नाचतगात  मिरवणक काढतात.समुद्र किनाऱ्यावर नारळाची मोठ्या भक्तिभावाने पुजन करतात.सागराची यथासांग पूजा करून नारळ नौकेतुन समुद्राला अर्पण केला जातो.

मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाच्या पाश्र्वभूमीवर सर्वच उत्सवांवर निर्बंध आले आहेत. तरीही करंजा येथील मच्छीमारांनी करोना नियमांचे पालन करीत नारळी पौर्णिमा साजरी केली. मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत सोन्याचा मुलामा दिलेला नारळ सागराला अर्पण करण्यात आला. याप्रसंगी करंजा मच्छिमार सोसायटीचे चेअरमन भालचंद्र कोळी, देवेंद्र कोळी, सिद्धेश कोळी, करंजा मच्छीमार संस्थेचे माजी अध्यक्ष के.एल.कोळी, माजी उपाध्यक्ष महेंद्र नाखवा,करंजा विद्यालयाचे चेअरमन सिताराम नाखवा आदी मान्यवर सहभागी झाले होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरण