पालघर : नवापूर पाम टेम्भि येथील आंबेडकरनगरमधील एका चाळी मध्ये राहणाऱ्या एका ५ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या रामजी यादव (४२) या नराधमास सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली आहे.पाम येथील बबन दळवी यांच्या चाळीत राहणाऱ्या एका कुटुंबातील पतीपत्नी तारापूरच्या औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात कामाला गेले असताना घरा बाहेर खेळत असलेल्या त्यांच्या ५ वर्षीय मुलीला खाऊचे आमिष दाखवून आरोपी यादव याने घरात नेऊन बलात्कार केला. याची माहिती मुलीच्या आईला कळल्यानंतर तिने सातपाटी सागरी पोलीस स्टेशनमध्ये तक्र ार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. (प्रतिनिधी)
पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास अटक
By admin | Updated: August 9, 2016 02:16 IST