शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरमानूरला दोन मुलांसह महिलेची गोदावरीत उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 20:18 IST

आत्महत्त्येचा प्रयत्न : महिला व मुलीस वाचविण्यात यश : दोन वर्षीय मुलगा मात्र बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नांदूर-मानूर येथील पुलावरून एका तीस वर्षीय महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह गोदावरीत उडी घेतल्याची घटना शनिवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास घडली़ या घटनेत महिला व तिच्या चार वर्षीय मुलीला वाचविण्यात यश आले असून दोन वर्षीय मुलगा मात्र वाहून गेला आहे़ दरम्यान संबंधित महिला ही बेशुद्ध असल्याने तिची ओळख पटविण्याचे काम सुरू असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास मानूर गावाजवळील गोदावरील नदीपात्रात एका महिला व चार वर्षीय मुलगी वाहत असल्याची माहिती नागरिकांनी दिली़ त्यानुसार घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिक व पोलिसांनी या मुलीस वाचवून व १०८ नंबरच्या अ‍ॅम्ब्युलन्सला कॉल केला़ अ‍ॅम्ब्युलन्समधील डॉ़अमित येवला हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व त्यांनी महिला व चारवर्षीय मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ महिला व तिच्या चार वर्षीय मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सुदैवाने मुलगी वाचली असून महिला बेशुद्ध आहे़ चार वर्षीय मुलगी घाबरली असल्याने तिला आपले नावही सांगता येत नसल्याने या कुटुंबाची ओळख पटलेली नाही़ दरम्यान या मुलीपेक्षा लहान दोन वर्षांचा मुलगा मात्र गोदावरीत वाहून गेला आहे़दरम्यान या घटनेची आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून महिलेने मुलांसह गोदावरील उडी का घेतली याचे कारण तसेच महिलेच्या कुटुंबियांची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून सुरू होते़--इन्फो--चिमूकलीचे दैव बलवत्तऱ़़महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह गोदावरील उडी मारली़ यामध्ये मुलगा वाहून गेला असला तरी मुलगी व महिला बचावली आहे़ यामध्ये महिला बेशुद्ध असली तरी मुलगी मात्र सुदैवाने बचावली असून ठणठणीत आहे़ या प्रकारामुळे ती घाबरली असून ती केवळ आई हा एकच शब्द बोलत होती़ केवळ, दैव बलवत्तर म्हणून ही चिमुकली बचावली आहे़