शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नंदा जिचकार यांनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार

By admin | Updated: March 6, 2017 14:55 IST

नंदा जिचकार यांनी सोमवारी नागपूर मनपा महापौरपदाचा पदभार स्वीकारला.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 6 -  नंदा जिचकार यांनी सोमवारी नागपूर मनपा महापौरपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी 'पक्ष नेतृत्वाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवक अशा सर्वांची साथ घेऊ न पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून शहराचा चौफेर विकास करू', अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी दिली.  महापालिका मुख्यालयात आयोजित महापौर पदग्रहण समारंभात त्या बोलत होत्या. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जो  विकासाच्या मार्ग दाखविला. त्यानुसार सर्व नगरसेवक व पदाधिकारी उत्तम काम करून जनतेची सेवा करतील. सोपवलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील, असेही जिचकार यावेळी म्हणाल्या.  आरक्षणामुळे मिळालेल्या संधीचे सोने करीत मोठ्या प्रमाणात महिला निवडून आलेल्या आहेत. पक्ष संघटनेत काम करणा-यांना पदाची संधी मिळते. त्यामुळे पक्षसंघटनेतही मन लावून काम करा, असे आवाहन यावेळी त्यांनी नगरसेवकांना केले.
 
तर, गेल्या दहा वर्षात माहपालिकेतील सत्तेच्या माध्यमातून भाजपाने शहरातील  ४० लाख जनतेची प्रामाणिक सेवा केली. यावर विश्वास दर्शवून जनतेने भाजपाच्या १०८ नगरसेवकांना निवडून दिले.  या विश्वासाला तडा जाणार नाही, असं आश्वासन सुधाकर कोहळे यांनी दिली. पक्षाने सोपविलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडणा-यांना पक्षाने पदे दिलेली आहे. नंदा जिचकार भाजपाच्या शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. सत्तापक्षनेते संदीप जोशी व स्थायी समितीचे भावी अध्यक्ष संदीप जाधव भाजपाचे शहर महामंत्री आहेत.  महापालिकेतील पदाधिकरी व नगरसेवक परिश्रम घेऊ न महापालिकेच्या पारदर्शी कारभाराच्या माध्यमातून नागपूर शहराला देशातील एक उत्तम शहर करतील, असा विश्वास कोहळे यांनी व्यक्त केला.
उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनीही विचार मांडले. सत्तापक्षनते संदीप जोशी यांनी आभार प्रदर्शनातून शहर विकासाची ग्वाही दिली. नगरसेविका दिव्या घुरडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.  
 
महापौरांनी पदभार स्वीकारला 
जाहीर पदग्रहण समारंभापूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी मावळते महापौर प्रवीण दटके यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच  उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी मावळते उपमहापौर सतीश होले यांच्याकडून तर  सत्तापक्षनेते संदीप जोशी दयाशंकर तिवारी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे व प्रवीण दटके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.