शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नाणार नाही लादणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 06:31 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादला जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

नागपूर : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांनाविश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादला जाणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.नाणार प्रकल्पावरून विधान परिषदेत विरोधक व सत्ताधारी सदस्यांमध्ये खडाजंगी झाली. काँग्रेसचे संजय दत्त यांनी लक्षवेधी मांडली होती. त्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. नाणारवर चर्चा सुरू झाल्यानतंर सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी ही लक्षवेधी पुढे ढकलण्याची सूचना केली. त्यावरून एकच गोंधळ झाला.अखेर स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, नवीन रिफायनरीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.त्यामुळे प्रदूषण होत नाही. अनेक देशात आधुनिक तंत्राचा वापर करून रिफायनरी उभारल्या जात आहे. राज्यात मोठी गुंतवणूक व रोजगार निर्मितीसाठी शासनाने हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. परंतु स्थानिक नागरिक, शेतकरी व विविध संघटना यांना प्रदूषण व अन्य बाबींविषयी शंका आहेत. त्यांचे निरसन करण्यास तसेच नाणार प्रकल्पाचा अभ्यास करण्यास आयआयटी मुंबई, नीरी आणि गोखले इन्स्टिट्यूट या संस्थांची नियुक्ती केलेली आहे. यांची अहवाल मिळाल्यावर व स्थानिक जनतेच्या शंका दूर झाल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करणार नाही. प्रकल्पासाठी सुमारे ५ हजार एकर जमीन शेतकऱ्यांनी देऊ केली आहे. त्यामुळे नाणारला शंभर टक्के शेतकºयांचा विरोध आहे, असे म्हणता येणार नाही. शिवसेनेचे मौननाणार प्रकल्पासाठी रस्त्यावर आणि सभागृहाच्या बाहेर विरोध करणाºया शिवसेनेने विधान परिषदेत मात्र मौनस्वीकारणे पसंत केले. विरोधकांनी अनेक प्रश्न विचारूनही नाणार प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया रद्द करण्याची अधिसूचना काढणारे शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई गप्प होते. यावरून शिवसेनेची सभागृहाबाहेरआणि सभागृहातील नाणारविषयीची भूमिका वेगवेगळी असल्याची टीका विरोधकांनी केली. 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस