शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

उपचारांच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीवर अत्याचार, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 02:29 IST

ऊसतोड कामगाराच्या २१ वर्षीय मुलीवर उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने तब्बल सहा वर्षे अत्याचार केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. या भोंदूबाबाने एकदा तिचा गर्भपातही करविला. याप्रकरणी भोंदूबाबासह त्याची पत्नी व मेहुण्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

बीड : ऊसतोड कामगाराच्या २१ वर्षीय मुलीवर उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाने तब्बल सहा वर्षे अत्याचार केल्याची घटना येथे उघडकीस आली आहे. या भोंदूबाबाने एकदा तिचा गर्भपातही करविला. याप्रकरणी भोंदूबाबासह त्याची पत्नी व मेहुण्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.पीडिता केज तालुक्यातील रहिवाशी आहे. तिचे आई - वडील उसतोड कामगार आहेत. २०१२ साली पीडितेला चक्कर येत होती. त्यामुळे तिला दासखेड येथील बाजी बाबाकडे नेण्यात आले. तेथे त्यांची विजय साधुजीराव वीर (२५) या भोंदूबाबासोबत ओळख झाली. वीर याने तिला आपल्या घरी ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तो पीडितेला कर्झणी या मूळ गावी घेऊन गेला. ठिकठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. २०१३ साली ती तीन ते चार महिन्यांची गर्भवती राहिली. त्या वेळी विजयने तिचा गर्भपातही करविला. लग्नाचे आमिष दाखवून तो तिच्यावर अत्याचार करीत असे, तसेच वाच्यता केल्यास अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत असे. संशय येऊ नये म्हणून तिला पुरुषांचा पेहराव करून फिरवित असे. एकदा तिला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केल्याचेही पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.सोमवारी रात्री सुमारास पीडितेने वीर याच्या मोबाइलवरून आपल्या आई - वडिलांशी संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधून तिची सुटका केली.भोंदूच्या पत्नीला अटकयाप्रकरणी विजय वीर, मंदा वीर व बनसोडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून मंदा हिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तिला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :BeedबीडCrimeगुन्हा