शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शाळेने दिलेल्या बाळकडूमुळेच नावलौकिक - अजित वाडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 02:05 IST

ज्या शाळेने मला क्रिकेटचे बाळकडू दिले त्या छबिलदास शाळेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही

मुंबई : जगाच्या क्रिकेट इतिहासात माझा कितीही नावलौकिक झाला असला तरी, ज्या शाळेने मला क्रिकेटचे बाळकडू दिले त्या छबिलदास शाळेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही. या शाळेमुळेच मी मोठा झालो, असे कृतज्ञपूर्वक उद्गार भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी काढले.दादर विभागातील छबिलदास हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या सीबीएससी इंग्रजी अभ्यासक्रमाचा शुभारंभ क्रिकेटपटू व शाळेचे माजी विद्यार्थी अजित वाडकेर यांच्या हस्ते नुकताच शाळेच्या सभागृहात करण्यात आला. या वेळी, अध्यक्षस्थानी संस्थेचे उपकार्याध्यक्ष शैलेश साळवी होते, तर याप्रसंगी खासदार हुसेन दलवाई, बाळ सडवेलकर, संस्थापक अक्षीकरांचे नातू श्रीकृष्ण अक्षीकर उपस्थित होते.अजित वाडेकर यांनी या वेळी शालेय जीवनातल्या अनेक आठवणी सांगून जागतिक स्तरावरील क्रिकेट स्पर्धेचा यशस्वी प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. ते म्हणाले, या शाळेने मला क्रिकेट जीवनात यशस्वी होण्यासाठी खूपकाही शिकविले. त्यामुळे मी जगात कुठेही गेलो तरी शाळेच्या आठवणी प्रेरणा देत असतात. तर बाळ सडवलेकर म्हणाले की, इंग्रजी भाषा जरूर शिकले पाहिजे. पण ती शिकताना आपल्या मराठी मातृभाषेचा विसर पडता कामा नये हे त्यांनी अधोरेखित केले. (प्रतिनिधी)