शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवनदायी’ला महात्मा फुले यांचे नाव

By admin | Updated: June 8, 2016 04:49 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव राज्य सरकारने बदलले

मुंबई : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव राज्य सरकारने बदलले असून, आता ही योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना नावाने राबविण्यात येणार आहे. या योजनेला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यांच्या नावे अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचे नाव देण्याचे विचाराधीन होते. तसे सूतोवाच आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले होते. मात्र, राजीव गांधींचे नाव बदलून बाळासाहेबांचे नाव दिले, तर राजकीय गदारोळ होईल म्हणून महात्मा फुलेंचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे म्हटले जात आहे. या योजनेची मुदत ३१ आॅक्टोबरला संपणार आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीचे यंदाचे वर्ष असून त्यानिमित्त हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. विमा संरक्षण रकमेत वाढ केली असून दरवर्षी प्रतिकुटुंब दीड लाख रु पयांऐवजी आता नव्या योजनेत दोन लाख रुपयांची मर्यादा करण्यात आली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठीची (किडनी ट्रान्सप्लांट) मर्यादा अडीच लाख रुपयांवरून तीन लाख रुपये करण्यात येणार आहे. समाविष्ट आजारांची (प्रोसिजर्स) संख्या ९७१ वरून ११०० एवढी करण्यात आली आहे. स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू वरील उपचाराचा खर्च तसेच सिकलसेल, अ‍ॅनिमिया, लहान मुलांचे आजार, वार्धक्याचे आजार यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील २ कोटी २६ लाख दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंब, शासकीय आश्रमशाळा, अनाथालय, वृध्दाश्रम, १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी तसेच पत्रकारांचादेखील समावेश या नव्या योजनेत करण्यात आला आहे. >अपघात विमा योजनाराज्यामध्ये रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या रु ग्णांवर पहिल्या ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार व्हावेत, यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींवर पहिले तीन दिवस मोफत उपचार करण्यात येतील. त्यानंतर त्या जखमींच्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना आवश्यकता वाटल्यास शासकीय रुग्णालय, खासगी किंवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रु ग्णालयात दाखल केले जाईल. राज्यातील २०० ट्रॉमाकेअर रु ग्णालये या योजनेत सहभागी केले जातील. या योजनेतील खर्चाची मर्यादा ३० हजार रुपये एवढी आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.