शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

‘लोकमत’च्या प्रेमाखातर वाचकाने गोंदविले नाव! नवी आवृत्ती लवकरच दिल्लीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 03:24 IST

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुरू झालेले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी नाते सांगणारे ‘लोकमत’ यंदा आपले शताब्दीवर्ष साजरे करत आहे. या शताब्दीनिमित्त येत्या १५ डिसेंबरपासून ‘लोकमत’ची नवी दिल्ली आवृत्ती सुरू होत आहे.

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुरू झालेले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी नाते सांगणारे ‘लोकमत’ यंदा आपले शताब्दीवर्ष साजरे करत आहे. या शताब्दीनिमित्त येत्या १५ डिसेंबरपासून ‘लोकमत’ची नवी दिल्ली आवृत्ती सुरू होत आहे. ‘लोकमत’ची ही १८वी आवृत्ती असेल व १४ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ७ वाजता नवी दिल्लीतील अशोका हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये होणा-या कार्यक्रमात तिचा शुभारंभ होईल.‘लोकमत’ने या प्रदीर्घ वाटचालीत आपली मूल्ये कटाक्षाने जपली असून, ‘पत्रकारिता परमो धर्म:’ या ध्येयाशी अतूट बांधिलकी ठेवली आहे. यामुळेच वाचकांचे ‘लोकमत’वर उदंड प्रेम आहे. गेली कित्येक वर्षे ‘लोकमत’चे निस्सीम वाचक असलेले केवलचंद कपूरचंद सिंघवी हे वाचकांच्या या अलोट प्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. केवलचंद सिंघवी यांनी आपल्या हातावर ‘लोकमत’ हे नाव १९८१मध्येच गोंदवून घेतले आहे. सिंघवी आजही त्याच भक्तिभावाने ‘लोकमत’ वाचतात व ‘लोकमत समूहा’चे अध्यक्ष विजय दर्डा यांच्याविषयीचे प्रेम नि:संकोचपणे व्यक्त करतात.आमच्या असंख्य निष्ठावंत वाचकांनी केवलचंद यांच्याप्रमाणे ‘लोकमत’ हे नाव गोंदवून घेतले नसेलही, तरी त्यांचे प्रेम निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकारितेशी आमच्या बांधिलकीची साक्ष देते. त्यामुळेच आम्हाला लाखो वाचकांचे प्रेम आणि आदर मिळत आला आहे. घडणाºया घटनांच्या निष्पक्षतेने बातम्या देताना आणि त्यावर निर्भीड संपादकीय लिहिताना ‘लोकमत समूहा’ने नेहमीच पत्रकारितेची उच्च मूल्ये पाळली आहेत. बातमीदारी करताना आम्ही आमच्या मूल्यांशी कधीही तडजोड केलेली नाही व कोणाचीही भीडमुर्वत न बाळगता नेहमीच लोकहिताचा विचार केला आहे.आम्ही असा पत्रकारितेचा स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण केल्यानेच ‘लोकमत’ला आज देशातील १० अग्रगण्य दैनिकांमध्ये स्थान आहे. ‘लोकमत’ हे महाराष्ट्र व गोवा या राज्यांतील सर्वाधिक वाचले जाणारे वृत्तपत्र असून, त्याची दैनंदिन वाचकसंख्या २३.५ दशलक्षांहून अधिक आहे. (आधार : टोटल रीडरशिप, आयआरएस १२ क्यू ४). १७ आवृत्त्या, ५७ उप-आवृत्त्या आणि सुदूर पसरलेले बातमीदारांचे जाळे यामुळे ‘लोकमत’ ख-या अर्थाने महाराष्ट्र आणि गोव्याचा आवाज म्हणून ओळखले जाते.आगळ्या शैलीचा ठसा असलेली पत्रकारिता व नावीन्याचा सातत्याचा ध्यास यामुळेच वाचकांच्या मनात आम्ही प्रेमाचे स्थान मिळवू शकलो आहोत. ‘लोकमत समूहा’तर्फे मराठीतील ‘लोकमत’, हिंदीतील ‘लोकमत समाचार’ आणि इंग्रजीतील ‘लोकमत टाइम्स’ ही तीन दैनिके प्रकाशित केली जातात व त्यांचा रोजचा खप २२ लाख प्रतींहून अधिक आहे.केवलचंद सिंघवी आणि त्यांच्यासारख्या असंख्य वाचकांपुढे कृतज्ञतेने नतमस्तक होतानाच आम्ही त्यांच्या प्रेमाचा व निष्ठेचा विनम्रतेने स्वीकार करतो.- विजय दर्डा, अध्यक्ष, लोकमत समूह

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र