शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी परम सुपर कॉम्प्युटरचे डॉ. विजय भटकर

By admin | Updated: January 28, 2017 16:59 IST

परम’ या भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे निर्माते, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - ‘परम’ या भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे निर्माते, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ  डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे. 
 
दोन महिन्यांपूर्वी जॉर्ज यिओ यांनी राजीनामा दिल्याने कुलपतिपद रिक्त झाले होते. डॉ. भटकर हे २५ जानेवारी २०१७ पासून डॉ. भटकर नालंदा विद्यापीठाचे कुलपती असतील. भारताच्या पहिल्यावहिल्या सुपरकॉम्प्युटरचे निर्माते आणि आयटी लीडर म्हणून डॉ. भटकर यांचा नावलौकिक आहे. त्यांना पद्मभुषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘सी-डॅक’ या संस्थेचे संस्थापक कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी देशाच्या संगणक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. विविध राष्ट्रीय संस्थांच्या निर्मितीतही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे डॉ. भटकर सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच कौन्सिल फॉर सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेच्या नियामक परिषदेचेही ते सदस्य होते. यांसह विविध राष्ट्रीय संस्थांमध्येही त्यांनी योगदान दिले आहे.
 
कुलपतीपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत डॉ. भटकर म्हणाले, ‘तक्षशिला व नालंदा या आद्य विद्यापीठांविषयी मी यापुर्वी अनेकदा बोललो होतो. पण एकदिवस नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी निवड होईल, असे वाटले नव्हते. त्यामुळे खुप आनंद झाला आहे. एक स्वप्न पुर्ण झाले. ही खुप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आहे. नालंदा विदयापीठाचे पुनरूत्थान करणे आव्हानात्मक आहे. काळाच्या ओघात भारतीय उच्च संस्कृती टिकून राहिली कारण ती ज्ञानाधिष्ठित आहे. संस्कृतीचे विचार मौल्यवान आहेत. त्यामुळे या विद्यापीठांचा वाटा खुप मोठा राहिला आहे. 
 
नालंदा विद्यापीठाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या विद्यापीठामध्ये जगभरातील विद्यार्थी यायला हवेत. त्यासाठी वैश्विक शिक्षण मिळायला हवे. सर्व भाषा, संस्कृतीची देवाणघेवाण, अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यासाठी तसे अभ्यासक्रम तयार करून वातावरण निर्माण केले जाईल, असे डॉ. भटकर यांनी नमुद केले.