शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नाणार प्रकल्प रायगडला; मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 06:29 IST

शिवसेनेच्या प्रचंड विरोधानंतर नाणारमध्ये प्रकल्प होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेलशुद्धिकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलवण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका लेखी उत्तरात बुधवारी दिले.शिवसेनेच्या प्रचंड विरोधानंतर नाणारमध्ये प्रकल्प होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. या प्रकल्पाबाबत विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्र्यांनी तेलशुद्धिकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यात होणार, असे स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र, त्या ठिकाणी सिडकोने औद्योगिक टाऊनशिप उभारण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे आणि त्या ठिकाणी भूसंपादनास स्थानिकांकडून कोणताही विरोध झालेला नाही, असेही स्पष्ट केले.अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांमधील ४० गावांमध्ये सिडकोच्या वतीने १३ हजार ४०९ हेक्टरमध्ये औद्योगिक टाऊनशिप उभारणे प्रस्तावित आहे. या प्रकल्पास स्थानिकांनी विरोध केलेला नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले मात्र, त्या ठिकाणी तेलशुद्धिकरण प्रकल्पच होणार असल्याचे सांगितले नाही. विरोधी पक्षांच्या वीसहून अधिक सदस्यांनी नाणारचा प्रकल्प रायगड जिल्ह्यात हलविणार का असा प्रश्न उपस्थित केला होता. त्या बाबत मुख्यमंत्र्यांनी हो वा नाही असे ठोस उत्तर न देता संदिग्धता कायम ठेवली. त्यामुळे तेलशुद्धिकरण प्रकल्प रायगडला हलविणार अशी जोरदार चर्चा माध्यमांमधून सुरू झाली. रायगड जिल्ह्यात हा प्रकल्प येऊ देणार नाही, अशी भूमिका शेकापचे नेते जयंत पाटील यांनी जाहीर केली.

टॅग्स :Nanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्प