शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: 'चीनमुळे आम्ही भारत, रशियाला गमावून बसलो'
2
आजचे राशीभविष्य - ६ सप्टेंबर २०२५, व्यवसायात लाभ होईल, कुटुंबात सुख- शांती लाभेल, रमणीय ठिकाणी प्रवासाला जा
3
अजित पवार यांना 'दादा'गिरी अंगलट; आधी फोनवरून झापलं, नंतर दिलं स्पष्टीकरण
4
Mumbai: १४ पाकिस्तानी ४०० किलो आरडीएक्ससह देशात घुसले
5
बाप्पाच्या निरोपाला वरुणराजाही, विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिका, पोलिसांकडून नियोजन
6
ganesh visarjan 2025: बाप्पाच्या निरोपाचे एआयद्वारे ट्रॅकिंग, ड्रोनने सूचना; २५ हजार पोलिस सज्ज
7
महापालिकेची पूर्वतयारी परीपूर्ण, राज्य निवडणूक आयुक्त आढाव्यानंतर समाधानी
8
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
9
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
10
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
11
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
12
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
13
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
14
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
15
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
16
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
17
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
18
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
19
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
20
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!

नागपुरी संत्रा रस्त्यावर

By admin | Updated: November 17, 2014 01:05 IST

देशातील इतर भागांच्या तुलनेत नागपूरची संत्री गोड आणि दर्जेदार असून, जगभरात लोकप्रिय आहेत. संत्रा हे विदर्भातील प्रमुख फळपीक असताना त्याच्या विपणन व ब्रँडिंगकडे शासाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.

उत्पादन जास्त पण भाव नाही : ब्रँडिंगकडे शासनाचे दुर्लक्षनागपूर : देशातील इतर भागांच्या तुलनेत नागपूरची संत्री गोड आणि दर्जेदार असून, जगभरात लोकप्रिय आहेत. संत्रा हे विदर्भातील प्रमुख फळपीक असताना त्याच्या विपणन व ब्रँडिंगकडे शासाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्याचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यंदा संत्र्याचा आंबिया बार मोठ्या प्रमाणात आल्याने व बाजारपेठेत हवी ती किंमत न मिळाल्याने नागपुरातील रस्त्यांवर बसून संत्र्यांची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काटोल परिसरातील शेतकरी संतोष आंबिलवादे हे आज टाटा एस गाडीने कळमना येथे यंत्रा विकायला घेऊन गेले. पण रविवारमुळे मार्केट बंद होते. व्यापारी संत्रा घेतील, अशी त्यांना अपेक्षा होती. एका व्यापाऱ्याने माल घेण्याची तयारीही दाखविली. पण भाव खूप पडका दिला. त्यामुळे संतोष हे तेथून संत्रा परत घेऊन निघाले. गर्दीच्या सक्करदरा चौकाच्या बाजूला त्यांनी रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली व रस्त्यावरच संत्रा विक्रीस सुरुवात केली. सध्या असेच काहीसे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसोबत घडत आहे. नागपूर शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला संत्र्याचे ढीग विक्रीसाठी लागलेले पहायला मिळत आहे. शेतकरी ३० ते ६० रुपये झडन या भावाने ग्राहक मिळेल तशी संत्र्याची विक्री करीत आहेत. दिवसभरात संत्रा विकला गेला नाही तर काही शेतकरी रात्र फुटपाथवर काढून दुसऱ्या दिवशी उरलेली संत्री विकत आहेत, तर काही शेतकरी उरलेली संत्री घेऊन गावी परतत आहेत. संत्र्याचे उत्पादन राजस्थान आणि पंजाब राज्यात होत असले तरीही आंबट-गोड चव आणि सुगंधामुळे नागपुरी संत्र्याला भारतात सर्वत्र मागणी आहे. पोषक जमीन आणि पाणी हे मुख्य कारण आहे. राजस्थान आणि पंजाब येथील संत्र्यांची चव कडवट आहे. हा संत्रा दिल्ली भागात केवळ ज्यूससाठी वापरला जातो. याउलट नागपुरी संत्रा ‘टेबल फ्रूट’ मानले जाते. नागपुरातून भारतात सर्वत्र आणि काठमांडूपर्यंत संत्रा पाठविला जातो. आतापर्यंत पारंपरिक पद्धतीनेच संत्र्यांची विक्री करण्यात येत आहे. उत्पादन कमी वा जास्त झाले तरीही जास्त भाव मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी दरवर्षीच थोडाफार संत्रा रस्त्याच्या कडेला विक्री करीत असल्याचे चित्र आहे. विक्री व्यवस्थापनात बदल केल्यास संत्रा उत्पादकांना निश्चितच फायदा होईल, असे शेतकऱ्यांनी सांगितले.पॅकिंग आणि प्रक्रिया कारखाने सुरू कराशासनाच्या कुचकामी धोरणामुळे नागपूर जिल्ह्यातील बंद असलेल्या प्रक्रिया आणि पॅकिंग कारखान्यांमुळे शेतकऱ्यांवर रस्त्यांवर संत्रे विकण्याची किंवा आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये आवक वाढल्याचे किंवा दिल्लीत थंडी वाढल्याचे कारण पुढे करून संत्र्याचे भाव जाणीवपूर्वक पाडले जातात. पूर्वी २५ ते ३० हजार रुपये टन असा भाव मिळालेल्या शेतकऱ्यांना जेव्हा १० हजार रुपये टन असा भाव मिळतो, तेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरतो. काटोल येथील १२ कोटींचा प्रक्रिया कारखाना ८ कोटींचा मोर्शी येथील आणि ८ कोटींचा कारंजा येथील पॅकिंग कारखाना धूळखात आहे. त्याकडे शासनाचे सपशेल दुर्लक्ष आहे. सध्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात १ लाख ३५ हजार हेक्टरवर ४ लाख संत्र्यांची झाडे आहेत. जास्त उत्पादन होणाऱ्या नागपुरी संत्र्याला सर्वाधिक मागणी आहे. पण स्थानिक भागात त्यावर प्रक्रिया करून अधिक रुपये मिळवून देणारे उद्योग प्रशासकीय यंत्रणेच्या तावडीत सापडल्याने संत्र्याचा कोळसा झाला आहे. हिवाळी अधिवेशनात पॅकेज द्यावे, अशी मागणी माजी आमदार सुनील शिंदे यांनी केली आहे.