शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये भर चौकातून दागिने पळविले

By admin | Updated: June 21, 2016 17:10 IST

पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ४ तोळ्यांचे दागिने लुटारूंनी हिसकावून नेले. सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वर्दळीच्या जरीपटक्यात ही खळबळजनक घटना घडली.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 21 -  पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील ४ तोळ्यांचे दागिने लुटारूंनी हिसकावून नेले. सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास वर्दळीच्या जरीपटक्यात ही खळबळजनक घटना घडली.माया जागेश्वर बोरकर (वय ५०) या लॉर्ड बुद्धा चौकातून पायी जात होत्या. त्यांच्या मागून आलेल्या पल्सरवरील दोन पैकी एका भामट्याने बोरकर यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ आणि मंगळसूत्र असे चार तोळ्यांचे दागिने हिसकावून पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे बोरकर यांना बराच वेळ काही सूचेनासे झाले. नंतर त्यांनी आरडाओरड केली. चौकात यावेळी मोठी गर्दी होती. बोरकर यांनी झालेला प्रकार ईतरांना सांगेपर्यंत लुटारू नजरेआड झाले होते. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या धाडसी जबरी चोरीची माहिती कळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहचले. वरिष्ठांना माहिती कळताच त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट दिला. गुन्हेशाखेसह ठिकठिकाणचे पोलीस पथक संशयीत पल्सरचालकांचा शोध घेऊ लागले. बोरकर यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.