शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! महिलेला विकलं; अल्पवयीन मुलीला स्वत:च्या घरी ठेवून वारंवार बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 06:56 IST

नागपूरमधील घटना; एकातून दुसरा गुन्हा उघड

- नरेश डोंगरेनागपूर : मानवी तस्करीत गुंतलेल्या एका नराधमाने साडेतीन महिन्यांपूर्वी निराधार महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशात विकले. तिची अल्पवयीन मुलगी स्वत:च्या घरी ठेवून घेतली आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. प्रचंड संतापजनक अशी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत.सुशील पैसाडील असे या आरोपीचे नाव असून तो अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. घटस्फोटित, निराधार आणि गरीब महिला, मुलींना आपल्या जाळ्यात ओढून तो त्यांना प्रारंभी मदत करतो. नंतर नोकरीचे आमिष दाखवतो. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या महिला, मुलीला परप्रांतात नेऊन विकतो. अजनीतील एक पतीपासून विभक्त झालेली विवाहित महिला जूनमध्ये त्याच्या संपर्कात आली होती. तिला १४ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा आहे. दोघांचा सांभाळ करतो असे सांगून मुलगी आणि मुलाला स्वत:च्या घरी ठेवले, तर महिलेला त्याने मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे नेले. त्या महिलेची मुलगी सातवीत शिकते. आरोपीची पत्नी घराबाहेर गेल्याची संधी साधून तो या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचा. तीन महिन्यात त्याने तिच्यावर अनेकदा पाशवी बलात्कार केला. आई-वडील कोणीच जवळ नसल्यामुळे पीडित मुलगी जीवाच्या धाकाने अत्याचार सहन करत होती. आरोपीची पत्नीही त्याबाबत काही बोलत नव्हती.असा झाला उलगडागिट्टी खदानमधील दोन तरुणींना एका टोळीने मध्य प्रदेशात नेऊन विकले. या घटनेचा बोभाटा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना शोधणे सुरू केले. त्यात आरोपी सुशील पैसाडील याचेही नाव आले. त्यामुळे पोलीस रविवारी त्याच्या अजनीतील घरी पोहोचले. त्याच्या घराची झडती घेतली असता अत्याचारग्रस्त मुलगी आणि तिचा लहान भाऊ आढळले. ती त्याची मुले नसतानादेखील त्याच्या घरी राहत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आरोपीने त्या अल्पवयीन मुलीवर स्वत: बलात्कार करतानाच तिला आपल्या मित्राच्याही हवाली केले. त्यामुळे त्याच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केल्याचा दुसरा संतापजनक पैलू उघड झाला आहे.

टॅग्स :Rapeबलात्कार