शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जुईनगर येथील नाल्यात मगरींचे वास्तव्य

By admin | Updated: August 6, 2016 02:39 IST

सानपाडा व जुईनगर परिसराला जोडणाऱ्या नाल्यात मगरींचे वास्तव्य असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नवी मुंबई : सानपाडा व जुईनगर परिसराला जोडणाऱ्या नाल्यात मगरींचे वास्तव्य असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नाल्याकिनारी बसलेली मगर पाहिल्यापासून लगतच्या इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. परंतु सदर नाल्याच्या सफाईची मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.जुईनगरच्या या नाल्यात मगर असल्याचे २ आॅगस्ट रोजी प्रथमच रहिवाशांच्या निदर्शनास आले. नाल्यालगतच्या झाडीमधून बाहेर येणारी ही मगर पाहणाऱ्यांना धक्काच बसला. त्यापैकी काहींनी या मगरीचे मोबाइलमधून फोटो देखील काढले आहेत. परिसरात इमारत बांधकाम करणाऱ्या कामगारांना इमारतीवरुन ही बाब प्रथम निदर्शनास आली. त्यांनी रहिवाशांना या प्रकाराची माहिती देताच त्यांनीही नाल्यालगत उघड्यावर बसलेली ही मगर पाहिली. तेव्हापासून नाल्यालगतच्या इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर ज्या ठिकाणी मगर दिसली, त्या ठिकाणापासून काही अंतरावरच जुईनगर स्थानकात जाण्याची पादचाऱ्यांची पाऊलवाट आहे. एकांताच्या वेळी या मगरीकडून त्यांच्यावर हल्ला देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रहिवासी मुकेश भानुशाली यांना सदर मगरीची माहिती मिळताच त्यांनीही सलग दोन दिवस नाल्यामध्ये पाहणी केली असता, त्यांनाही दोन्ही वेळेस पाण्यावर तरंगताना मगर पहायला मिळाली. परंतु अनेकांना दिलेली मगर एकच की त्याठिकाणी इतरही मगरींचे वास्तव्य आहे, याबाबतचा उलगडा होवू शकलेला नाही. भानुशाली हे गेली आठ महिन्यापासून सदर नाल्यातला गाळ काढून नाल्याची सफाई केली जावी यासाठी पालिकेकडे पत्रव्यवहार करत आहेत. परंतु त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अद्यापही नाल्यात डेब्रिजचे ढीग तर अनेक फूट उंच वाढलेली झाडी पहायला मिळत आहेत. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरत असून, डासांचाही त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे. अशातच मगरीने त्यांच्या मनात भीती निर्माण केली आहे. नाल्याला सुरक्षा कठडा देखील नसल्यामुळे सहज ही मगर इमारतींच्या आवारात देखील येवू शकते, अशी भानुशाली यांच्यासह इतर रहिवाशांना भीती सतावत आहे. साधारण ८ ते १० फुटाची ही मगर असल्यामुळे एखाद्या व्यक्तीला दुखापत पोचवून भक्ष बनवू शकते. मात्र ही मगर त्याठिकाणी आली कुठून असाही प्रश्न त्यांना पडला आहे.औद्योगिक क्षेत्रातले पाणी वाहून नेण्यासाठी असलेला हा नाला जुईनगर स्थानकासमोरून एलोरा इमारतीपासून सानपाड्याच्या मिलेनियम टॉवरपर्यंत जातो. त्यामुळे ही मगर नाल्याच्या संपूर्ण परिसरात वावरत असल्यास जुईनगर ते सानपाडापर्यंत नाल्यालगत वावरणाऱ्यांना तिच्यापासून हानी पोचण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)