ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 27 - नागभूषण फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा नागभूषण पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण १ जानेवारी १०१७ रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर तर विशेष अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. अजय संचेती, माजी खासदार दत्ता मेघे उपस्थित राहतील, अशी माहिती नागभूषण फाऊंडेशनचे सचिव डॉ. गिरीश गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.मंगळवारी राष्ट्रभाषा संकुलात आयोजित या पत्रकार परिषदेला फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, उपाध्यक्ष सत्यनारायण नुवाल, कोषाध्यक्ष ब्रजकिशोर अग्रवाल उपस्थित होते. हा पुरस्कार वितरण सोहळा १ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता राष्ट्रभाषा संकुलातील साई सभागृहात होणार असून एक लाख रुपये रोख व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना नागभूषण पुरस्कार
By admin | Updated: December 27, 2016 20:12 IST