शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

नामशेष होतोय हेमाडपंती मंदिरांचा ठेवा : निधी मंजूर; मुहूर्त मिळेना

By अझहर शेख | Updated: July 31, 2017 22:15 IST

अझहर शेख / लोकमत आॅनलाइन, नाशिक -  यादवकाळात त्या क्षेत्राची राजधानीचा नावलौकिक आणि रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया नाशिक जिल्ह्यातील ...

ठळक मुद्देप्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जैन व हिंदू मंदिरांचा अमूल्य व दुर्मीळ ठेवा संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेल्या १६ मंदिरांच्या पुनर्विकासासाठी १६.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर मंदिराची दुरवस्था कायम असून फलक मात्र चकाचक असल्याचे चित्र निधी मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटलामंदिरे काळानुरूप जीर्ण झाली असून त्यांची पडझड सुरूच आहे

अझहर शेख / लोकमत आॅनलाइन, नाशिक -  यादवकाळात त्या क्षेत्राची राजधानीचा नावलौकिक आणि रामायणात अंजनीपुत्र हनुमानाचे जन्मस्थळ होण्याचा अभिमान बाळगणाºया नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या अंजनगिरी पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावातील सुमारे एक हजार वर्षाहुन अधिक प्राचीन हेमाडपंती स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली जैन व हिंदू मंदिरांचा अमूल्य व दुर्मीळ ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा ठेवा जतन व्हावा, यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाकडून भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारितीत गेल्या वर्षी सुमारे १६ कोटी ७५ लाखांचा निधी केंद्राकडून मंजूर करण्यात आला; मात्र अद्याप येथील १६ हेमाडपंती मंदिरांच्या पुनर्विकासाच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने मंदिरांची पडझड रोखण्यास प्रशासनाला अपयश येत आहे.नाशिक शहरापासून अवघ्या २१ किलोमीटर आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरपासून सहा किलोमीटर अलीकडे असलेल्या अंजनेरी तीर्थक्षेत्र एकेकाळी जैन धर्मीय समाजबांधवांची वसाहत म्हणूनदेखील ओळखले जात होते. या अंजनेरी गावाच्या वेशीवर असलेल्या विविध जैन व हिंदू धर्मीय हेमाडपंतीय पुरातन मंदिरे आजही गौरवशाली धार्मिक इतिहासाची साक्ष देतात. येथील मंदिरांमध्ये आढळलेल्या शिलालेखावरील उल्लेखानुसार इसवी सन ११४२ (शके १०६३)मध्ये यादवकालीन राजाच्या एका मंत्र्याकडून येथील पुरातन मंदिरांचा जीर्णोध्दाराचा प्रयत्न झाल्याचे पुरावे आढळतात. तसेच १७०८ साली जेव्हा अंजनेरी राजधानी मराठा पेशव्यांच्या साम्राज्यात विलीन झाली तेव्हादेखील येथील मंदिरांच्या विकासाचा प्रयत्न केला गेला. येथील सर्व मंदिरांच्या सभोवताली संरक्षक जाळ्यांचे कुंपण भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात आले आहे. सदर मंदिरे ही प्राचीन स्मारके घोषित करून ३ एप्रिल १९१६ साली इंग्रज राजवटीत भारतीय पुरातत्व विभागाकडून संरक्षित वास्तू म्हणून जाहीर करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत या मंदिरांभोवती पुरातत्व विभागाने संरक्षण कुंपण घालण्याखेरीज दुसरी कुठलीही उपाययोजना हा ठेवा जतन करण्याच्या दृष्टीने केल्याचे दिसत नाही.

old Temple

गेल्या वर्षी ११ मार्च रोजी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी कें द्रीय पुरातत्व विभाग निधीअंतर्गत अंजनेरी परिसरातील जीर्ण झालेल्या पुरातन संरक्षित वास्तू म्हणून घोषित केलेल्या १६ मंदिरांच्या पुनर्विकासासाठी १६.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी थाटामाटात मंदिरांचे नूतनीकरण व विकासकामाचे उद्घाटन के ले; मात्र हे उद्घाटन सध्या येथे झळकत असलेल्या माहिती फलकाचेच झाले की काय? अशी शंका नाशिककरांसह परराज्यातून येणाºया भाविक व पर्यटकांकडून उपस्थित केली जात आहे. कारण मंदिराची दुरवस्था कायम असून फलक मात्र चकाचक असल्याचे चित्र नजरेस पडते. त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निधी मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटला असतानाही अद्याप मंदिरांच्या विकासकामाला कुठलीही सुरूवात होऊ शकली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझडयेथील ऐतिहासिक प्राचीन संरक्षित वास्तू म्हणून भारतीय पुरातत्व विभागाने घोषित केलेल्या मंदिरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. काही मंदिरे नामशेष झाली असून सर्वत्र विखुरलेल्या दगडांवरून मंदिरांचे अवशेष लक्षात येतात. काही मंदिरे काळानुरूप जीर्ण झाली असून त्यांचीदेखील पडझड सुरूच आहे. हा दुर्मीळ प्राचीन व उत्कृष्ट स्थापत्यक लेचा नमुना असलेला ठेवा वेळीच जतन करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न लवकर सुरू न झाल्यास हा ठेवा संपूर्णपणे नामशेष होण्याचा धोका आहे.