शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

Myucormicosis: औषधांसाठी करावी लागते थेट मुंबईवारी; राज्यात म्युकरमायकोसिस इंजेक्शनची काळाबाजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 05:32 IST

इंजेक्शनचा भासतोय तुटवडा, रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव; काळाबाजार थांबवण्याची मागणी

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचे २५ रुग्ण आढळून आले आहेतकाही रुग्णांनी उपचारासाठी पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे धाव घेतली आहे.उपचारासाठी लागणारे इंजेक्शन सरकारी रुग्णालयात उपलब्ध नाहीत.

मुंबई :  राज्यात म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण विविध जिल्ह्यांत आढळून येत असून, या रुग्णांना लागणाऱ्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. इंजेक्शन मिळत नसल्याने बाहेरच्या जिल्ह्यांत शोधाशोध करावी लागत असून, उपचारासाठी इतर जिल्ह्यांत धाव घ्यावी लागत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्याची मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात म्युकरमायकोसिस आजाराचे २५ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांना लागणारे इंजेक्शन नगरमध्ये मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची इंजेक्शनसाठी माेठी धावाधाव होत आहे. काही रुग्णांनी उपचारासाठी पुणे, ठाणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद येथे धाव घेतली आहे. सध्या जिल्ह्यात प्रत्येक दिवशी १०० ते १२५ इंजेक्शनची गरज लागत आहे.

औरंगाबाद, परभणी, जालना जिल्ह्यात या आजारावरील उपचारासाठी लागणारे इंजेक्शन उपलब्ध नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. इंजेक्शनची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने इंजेक्शनची मागणी कंपन्यांकडे नोंदविली आहे. बीड जिल्ह्यात उपचारासाठी लागणारे इंजेक्शन सरकारी रुग्णालयात उपलब्ध नाहीत. खासगी औषध वितरकांनी इंजेक्शनची मागणी केली आहे, परंतु त्यांनाही अजून मिळाली नाहीत, अशी माहिती औषध निरीक्षक रामेश्वर डोईफोडे यांनी दिली.

औषधांसाठी करावी लागते थेट मुंबईवारी साताऱ्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा १२ च्या पुढे गेला आहे. यावर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे त्याच्या शोधार्थ नातेवाइकांना मुंबईची वारी करावी लागत आहे. इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे सध्या त्याचा काळाबाजारही होत असल्याचे आढळून येत आहे. अतिरिक्त पैसे मोजण्याची तयारी दाखवूनही औषधे मिळत नसल्याने रुग्णांवर उपचार करायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या