मुंबई : बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सच्या विमानतळावर झालेल्या हल्ल्यात मुंबईतील निधी चाफेकर आणि अमित मोटवानी जखमी झाले. यापैकी निधीने माझी प्रकृति स्थिर असून लवकरच मुंबईत येणार असल्याची माहिती कुटुंबीयांना दिल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. अंधेरी येथील चकाला परिसरात निधी पती आणि दोन मुलांसोबत राहते. गेल्या २० वर्षांपासून ती जेट एअरवेजमध्ये फ्लाईट मॅनेजर म्हणून काम करते. ब्रसेल्सच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर निधीचा फोटो व्हायरला झाला. ती जखमी झाल्याची माहिती मिळताच तिच्या कुटुंबियाना हादरा बसला. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच तिने घर सोडले होते. जाण्यापूर्वी सर्वांशी नेहमीप्रमाणे निरोप घेत ती निघाली.
माझी प्रकृति स्थिर आहे : निधी
By admin | Updated: March 25, 2016 02:30 IST