शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड तालुक्यास पावसाने झोडपले

By admin | Updated: June 27, 2016 02:13 IST

मुरुड तालुक्यास गेले पाच दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले.

आगरदांडा / मुरुड : मुरुड तालुक्यास गेले पाच दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले. आतापर्यंत ६८५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. बळीराजा व नागरिकांना मोठा दिलासा या पावसाने दिला आहे. आगरदांडा वगळता कुठेही पाणी साचलेले पाहण्यास मिळाले नाही. मात्र पावसाची सुरुवात झाली तेव्हापासून काही ठिकाणी दिवसातून १५ वेळेपेक्षा अधिक काळ जास्त वीजपुरवठा खंडित होतो. या विजेमुुळे काही जणांने नुकसान झाले आहे तरीही वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना वीजपुरवठा वारंवार का खंडित होते याचे कारण अजूनपर्यंत समजू शकलेले नाही. मुरुड शहर व पंचक्रोशीतील नागरिक या वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराला कंटाळले आहेत. मुरुड तहसीलदार कार्यालयाकडून सुद्धा वारंवार वीज का खंडित होते, यासंदर्भात नोटीस बजावली आहे. तर काही पुढाऱ्यांनी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदने दिली आहेत. या मुसळधार पावसामुळे पर्यटकांची संख्या फारच कमी झालेली दिसून येत आहे. यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील लॉज व छोट्यामोठ्या किरकोळ विक्रेत्यांचा व्यवसाय पूर्णत: थंडावला आहे. मुरुड तहसीलदार कार्यालयाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून, काही गंभीर प्रसंग उद्भवल्यास तातडीने तहसीलदार कार्यालय व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्याकडे संपर्क साधण्यास सांगितले आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच पावसाच्या या दमदार हजेरीमुळे शेतातील सर्व भागांत पाणीच पाणी साचले आहे. एवढा पावसाचा जोर असून, या पावसाने आतापर्यंत कोणतेही आर्थिक नुकसान केलेले नाही. मात्र सतत पाऊस असल्याने सर्व व्यापाऱ्यांचा धंदा सुद्धा मंदगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)रस्त्यावर साचले पाणीसुरुवातीच्या टप्प्यातच पावसाच्या या दमदार हजेरीमुळे शेतातील सर्व भागांत पाणीच पाणी साचले आहे. एवढा पावसाचा जोर असून, या पावसाने आतापर्यंत कोणतेही आर्थिक नुकसान केलेले नाही. मात्र सतत पाऊस असल्याने सर्व व्यापाऱ्यांचा धंदा सुद्धा मंदगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. गंभीर प्रसंग उद्भवल्यास तहसीलदार कार्यालय व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्याकडे संपर्क साधण्यास सांगितले आहे.