मुंबई : मालवणीच्या न्यू कलेक्टर कंपाउंडमध्ये असलेल्या एका घरात २५ ते ३० वयोगटातील एका इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी सायंकाळी सापडला होता. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून, अजून एकाला ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. चंदन यादव (२८) असे मयत तरुणाचे नाव असून, त्याचा मृतदेह सोमवारी सायंकाळी सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी सायराबानो अनिलकुमार पांडे नावाच्या महिलेला अटक केल्याचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी सांगितले. अनैतिक संबंधातून ही हत्या करून सायरोबानोचा नवरा फरार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या
By admin | Updated: January 20, 2016 02:41 IST