शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरुन नव-याने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 16:50 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नव-याने तिची हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ही थरारक घटना घडली.

नागपूर, दि. 12 -  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन दारुड्या नव-याने तिची हत्या केली. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ही थरारक घटना घडली. ममता एकनाथ कोहळे (वय २४) असे मृत महिलेचे नाव असून आरोपीचे नाव एकनाथ काशिनाथ कोहळे (वय २७) आहे.  डिप्टी सिग्नल, पुंजाराम वाडी झोपडपट्टीत त्याचे घर आहे.   एकनाथ मोलमजुरी करतो. चार वर्षांपूर्वी त्याचा ममताशी विवाह झाला होता. त्याना दोन मुले आहेत. एकनाथला दारूचे व्यसन असून तो संशयी वृत्तीचा असल्यामुळे पत्नी ममताशी नेहमी वाद होत होता. अनेकदा वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात व्हायचे. रोजच्या कटकटीला कंटाळून काही दिवसांपूर्वी ममता दोन्ही मुलांसह माहेरी निघून गेली. त्यामुळे एकनाथने घरातील  वस्तू विकून दारूचे व्यसन भागविण्यास सुरूवात केली. 

मात्र, जेवणाचे भागत नसल्यामुळे शुक्रवारी एकनाथ  पत्नीला भेटायला सासरी गेला. त्याने ममताला सोबत चलण्यास सांगितले. तिने नकार दिल्यामुले त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यावेळी एकनाथने नमते घेण्याचा बनाव केला. यापुढे दारू पिणार नाही आणि तुझ्या चारित्र्यावर संशय घेणार नाही, असे आश्वासन तिला सासूसास-यांपुढे दिले. त्यामुळे ममताच्या आईवडीलांनी तिचे मन वळवून तिला एकनाथसोबत जाण्यास सांगितले. 

सायंकाळी पत्नीसह घरी आल्यानंतर तो बाहेर गेला आणि रात्री १० च्या सुमारास एकनाथ पुन्हा दारूच्या नशेत टून्न होऊन आला. सोबत दारूची बाटलीही होती. त्याने ममताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ केली. त्यामुळे दोघात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी एकनाथने तिला मारहाण केली आणि रागाच्या भरात दोघेही जेवण न करताच झोपले. पहाटे  ४ च्या सुमारास एकनाथ उठला. घरात ठेवलेली दारू ढोसायला त्याने सुरूवात केली. ममताने त्याला विरोध केल्यामुळे त्याने घरात पडलेल्या लाकडी दांड्याने तिला बदडणे सुरू केले. रागाच्या भरात त्याने तिच्या डोक्यावर फटके मारले. 

त्यामुळे ती गंभीर जखमी झाली. आरडाओरड ऐकून शेजारी धावले. त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेत ममताला मेयोत दाखल केले. तेथे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खेतारीन अंकालु महीलांगे (वय ५०) यांनी तक्रार नोंदवल्यानंतर कळमना पोलिसांनी एकनाथवर खुनाचा गुन्हा दाखल केला. तो फरार  असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.