शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये खूनसत्र : मनपा कर्मचाऱ्याची हत्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2017 15:46 IST

एका महापालिका कर्मचाऱ्याची हत्त्या करून मृतदेह अज्ञात हल्लेखोरांनी गोदापात्रात फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे आज दुपारी उघडकीस आले.

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : शहरात गुन्हेगारी फोफावली असून सातत्याने नाशिकमध्ये होणाऱ्या खूनाच्या घटनांनी शहर हादरले आहे. शहरातील पंचवटी परिसर खूनाच्या घटनांमुळे सर्वाधिक चर्चेत आहे. मंगळवारी पंचवटी भागातील म्हसरुळजवळ राहणाऱ्या एका युवतीची हत्त्या करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. अद्याप या गुन्ह्याची उकल देखील झाली नसताना पुन्हा रामवाडी परिसरात एका महापालिका कर्मचाऱ्याची हत्त्या करून मृतदेह अज्ञात हल्लेखोरांनी गोदापात्रात फेकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे आज दुपारी उघडकीस आले. मृतदेहाची पोलिसांनी ओळख पटविली असून उदय कॉलनीमधील रहिवासी महापालिका आरोग्य विभागातील कर्मचारी अरूण बर्वे असे मयत इसमाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या खूनाच्या घटनेतील सर्व संशयित फरार आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. पंचवटी भागात सर्व खूनाच्या घटनांची पाळेमुळे आढळून येत आहे. मनपा कर्मचारी बर्वे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी पाठीवर, डोक्यावर, पोटावर धारधार शस्त्रास्त्राने वार केल्याचे पंचनाम्यात आढळून आले आहे. धार्मिक पर्यटनासाठी प्रसिध्द असलेला पंचवटी परिसर सध्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत आहे.