शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नागपूरकरांच्या प्रेमात पडला "मुन्ना मायकल" (फोटो स्टोरी)

By admin | Updated: July 13, 2017 13:31 IST

न्सिंग स्टार टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांच्या झुमके स्टाईलने नागपूरकरांना अगदी बेभान केले.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि . 13 - डान्सिंग स्टार टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री निधी अग्रवाल यांच्या झुमके स्टाईलने नागपूरकरांना अगदी बेभान केले. जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या स्मृतिदिनानिमित्त आणि मुन्ना मायकल या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टायगर व निधी तसेच सुप्रसिद्ध गायक सिद्धार्थ महादेवन काल बुधवारी नागपुरात आले होते. यावेळी टायगर श्रॉफ याने अभिनेत्री निधी अगरवालसमवेत दिलखेचक अदांसह ठेका धरला. यावेळी मुन्ना मायकलच्या कलाकारांसोबत सेल्फी काढण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली होती.नागपूरमध्ये कोराडी मार्गावरील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इन्डोअर स्टेडियममध्ये टायगर श्रॉफने मायकल जॅक्सनला अनोखी नृत्यांजली वाहिली. लोकमत आणि प्रीति आयआयटी पिनॅकल यांच्या सहयोगाने मायकल जॅक्सनला नृत्यांजली म्हणून टायगरचा हा कार्यक्रम आयोजित केला होता.

टायगर व निधी स्टाररमुन्ना मायकल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. याच मुन्ना मायकलच्या एक्झॉटिक लव्ह साँगवर टायगर व निधी या दोघांनी धम्माल डान्स करत नागपूरकरांना आपल्या तालावर नाचवले.  

दिल हैं आवारा तो ऐतराज क्यो हैं... या पहिल्याच गाण्यावर टायगर व निधी असे काही थिरकलेत की, अख्खे स्टेडियम नाचायला लागले.

यानंतर मेरी वाली डिंग, डांग, डिंग, डांग, डिंग, डांग, डिंग, डांग, करती हैं... या गाण्यावरच्या टायगरच्या डान्सने तर अख्खे स्टेडिअम बेभान झाले. 

प्रेक्षकांनी खचाखच भरलेले स्टेडिअम पाहून टायगर श्रॉफ व निधी अग्रवाल या दोघांना या गर्दीसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. सिद्धार्थ महादेवनही मग त्यांच्यात सामील झाला. या तिघांनी नागपुरकरांसोबत झक्कासपैकी सेल्फी घेतला.

मी जगभरात फिरलोय. पण नागपूरसारखे दर्दी चाहते पाहिले नाहीत. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने मी आज बोलतोय. मी आज याठिकाणी तुमच्याशी संवाद साधतोय, याचे संपूर्ण श्रेय लोकमतचे आहे. यासाठी मी सर्वप्रथम लोकमतचे आभार मानेल, असे टायगर श्रॉफ म्हणाला.

मुन्ना मायकल हा निधी अग्रवालचा पहिला चित्रपट. या पहिल्याच चित्रपटाचा अनुभव निधीने नागपूरकरांशी शेअर केला. पहिल्याच चित्रपटात मला टायगर आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. टायगरने मला बरीच मदत केली. मी डान्स शिकले आहे. पण तरिही त्याच्यासोबत डान्स करताना मी प्रचंड नर्व्हस होते. पण त्याने मला माझे नवखेपण विसरायला भाग पाडले. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव धम्माल होता, असे निधी म्हणाली.

सिद्धार्थ महादेवन याने दिल हैं आवारा तो ऐतराज क्यो हैं... हे सादर करत, प्रेक्षकांची मने जिंकलीत. यानंतर सिद्धार्थची छोटेखानी मुलाखतही रंगली. यावेळी एका प्रश्नाने सिद्धार्थची चांगलीच गोची केली. तू कंपोझर आहेस आणि गायकही. यापैकी सर्वांधिक तुला काय आवडतं? असा प्रश्न सिद्धार्थला केला गेला. यावर हा फार कठीण प्रश्न आहे. हे म्हणजे दोन मुलांमधून तुझा सर्वाधिक लाडका कोण? असे विचारण्यासारखे आहे, असे सिद्धार्थ म्हणाला.