शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

महापालिकेचे ‘मत’बजेट!

By admin | Updated: February 4, 2016 04:38 IST

झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी गतवर्षीपेक्षा दहापटीने वाढ करीत शंभर कोटींची तरतूद तसेच खास गरिबांसाठी नऊ हजार कोटी रुपयांच्या पायाभूत विकासाची तरतूद करून व्होट बँकेला खूश करण्याचा प्रयत्न

झोपडपट्टी विकासासाठी दहापट अधिक तरतूद; करवाढीचे केवळ संकेत, शिवसेनेवर भाजपाची कुरघोडीमुंबई : झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी गतवर्षीपेक्षा दहापटीने वाढ करीत शंभर कोटींची तरतूद तसेच खास गरिबांसाठी नऊ हजार कोटी रुपयांच्या पायाभूत विकासाची तरतूद करून व्होट बँकेला खूश करण्याचा प्रयत्न सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने अर्थसंकल्पातून केला. एका बाजूला करवाढीचे संकेत दिले असले तरी दुसरीकडे आगामी निवडणुकीवर डोळा ठेवल्याचे स्पष्ट चित्र अर्थसंकल्पात दिसले. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ३७ हजार ०५२़१५ कोटींचा अर्थसंकल्प आयुक्त अजय मेहता यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना आज सादर केला़ हा अर्थसंकल्प चार कोटी ६६ लाख शिलकीचा आहे़ मात्र उत्पन्नाचे प्रमुख स्रोत असलेल्या जकात कर आणि विकास नियोजन खात्यातून मिळणाऱ्या महसुलात लक्षणीय घट झाल्याचा फटका पालिकेच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे़ त्यामुळे दीर्घ मुदतीसाठी राखीव विशेष निधीतून पाच हजार ५०९़७२ कोटी रुपये उचलून आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फुगविण्यात आला आहे़ तसेच उत्पन्नासाठी पर्यायी स्रोत विकसित करण्याबरोबरच अनावश्यक खर्चामध्ये कपात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ उत्पन्नात सातत्याने घट आणि जकात कर रद्द झाल्यास पालिकेचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी भविष्यात करवाढीचे संकेत प्रशासनाने दिले आहेत़ त्याचबरोबर झोपडपट्ट्यांना मालमत्ता कर, कच्च्या तेलावरील जकात करवाढ आणि मुंबईबाहेरील रुग्णांसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्याचेही जाहीर करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)मुंबईत १५ लाख झोपडीधारक आहेत़ या झोपड्यांवर मालमत्ता कर आकारण्याचा प्रस्ताव गेली दोन वर्षे चर्चेत आहे़ मात्र निवडणुकीच्या काळात हा प्रस्ताव लांबणीवर पडला़ मात्र भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीनुसार हा कर लागू न करता प्रत्येक झोपडीवर ठोक दराने मालमत्ता कराची आकारणी केली जाणार आहे़ याबाबतचा प्रस्ताव विधी समिती व पालिका महासभेच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे़झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी राखीव तरतूद दहा कोटींवरून १०० कोटींवर तसेच गरिबांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी ९,१८७़९५ कोटी रुपयांची तरतूद़डांबरी रस्ते आणि सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी २,८०६़८० कोटी रुपये, तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी १,३४० कोटी रुपये तरतूद़ तर डांबरी रस्त्यासाठी १,४६६ कोटी रुपये तरतूद़स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी आशावादीमुंबईत उद्योगधंद्यासाठी पोषक असे वातावरण असल्याने तसेच सर्वसमावेशक प्रकल्प अहवाल दक्षतापूर्वक तयार करण्यात आल्याने पुढील फेरीत मुंबईची स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड होईल, असा विश्वास आयुक्त अजय मेहता यांनी व्यक्त केला़पंतप्रधानांच्या योजनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची छाप अर्थसंकल्पावर दिसून आली आहे़ स्वच्छता अभियानांतर्गत उपक्रम, मेक इन इंडिया अशा प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे़