शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

महापालिकेला मिळाले २२५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2017 02:05 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेला गेल्या आर्थिक वर्षात विविध कर आणि महसुलांद्वारे २२०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला गेल्या आर्थिक वर्षात विविध कर आणि महसुलांद्वारे २२०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. एलबीटी १३०० कोटी, मिळकत करातून ३१६ कोटी, बांधकाम परवानगीद्वारे २६१ कोटी, पाणीपट्टीतून ३२ कोटी अशा करांतून महापालिकेला २ हजार २६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. एलबीटीवगळता अन्य कोणत्याही विभागाचे उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. एलबीटीचे एक हजार ३५० कोटींचे उद्दिष्ट होते. एक हजार ३९३ कोटी उत्पन्न मिळाले आहे. एकशे एक टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सुधारित अंदाजपत्रकात एक हजार ३९० कोटींचा उल्लेख होता. प्रत्यक्षात एलबीटीद्वारे पालिकेस एक हजार ३९३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. मिळकतकरातून महापालिकेस ३१६ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. पालिकेला ४०० कोटी अपेक्षित होते. मागील वर्षी ४११ कोटींंचा भरणा झाला होता. त्याचबरोबर साठ मिळकतींवर जप्तीची कारवाई केली होती. त्यांपैकी १२ सील करण्यात आल्या. जप्तीच्या कारवाईमुळे नागरिकांनी मिळकतकर मोठ्या प्रमाणात भरला आहे.जकातीचा आलेख वर्षागणिक उंचावणारा होता. मात्र, जकातीला समर्थ पर्याय समजल्या जाणाठया एलबीटीमुळे उत्पन्नात पहिल्या वर्षी घट झाली ; तर दुसठया वषार्पासून वाढ होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनात आनंदाचे वातावरण आहे. वंष्ठपनी खाते तपासणी, मुद्रांक शुल्क वगळता एलबीटी उत्पन्नात निव्वळ ९० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. एलबीटीची अंमलबजावणी झाल्यापासून महापालिकेच्या इतिहासातील हे सर्वोच्च उत्पन्न आहे. या आर्थिक सुबत्ततेचा अनुकूल परिणाम महापालिकेच्या विकास कामांवर होणार आहे. महापालिकेला मुद्रांक शुल्कातील एक टक्के वाटा म्हणून चालु आर्थिक वर्षात १०५ कोटी ५५ लाख रुपये मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षात निवासी बांधकामांच्या तुलनेत व्यावसायिक बांधकामांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.(प्रतिनिधी)३ कोटी पाणीपट्टी वसूल झाली. तीस हजारांच्या वर थकबाकी असणाऱ्या तीन हजार थकबाकीदारांना नोटीस बजावल्या होत्या; तर १६० नळजोड तोडले. यामध्ये थकबाकी ही २८ कोटी २७ लाख एवढी होती. त्यांपैकी २३ कोटी ७६ लाखांची वसुली झाली आहे.बांधकाम परवानगीद्वारे २६१ कोटीचे उत्पन्न मिळाले. सर्वाधिक वसुली वाकडमधून ७० कोटी झाली. रावेत ३०, रहाटणी २३, पिंपळे गुरव २२, पिंपरी १८, थेरगाव १७, मोशी-बोऱ्हाडेवाडी २५, आकुर्डी चार कोटी रूपये उत्पन्न मिळाले.मुदत ठेव व्याज व इतर व्याजातून ४५ कोटी, रस्ता दुरुस्ती व अनुदानातून ७३, नगररचना विभाग ८२, आकाशचिन्ह परवाना विभागातून ४२, भूमी आणि जिंदगी विभागातून १५ आणि इतर ४७ कोटी उत्पन्न मिळाले.महिनाएलबीटीमुद्रांक सरकारीएकूण शुल्क अनुदानउत्पन्न कोटीतएप्रिल५१.७८७.६५००५९.४३ मे४४.९२८.६११२३.८८१७७.४१ जून३९.६५११.०४६१.९४११२.६३जुलै४६.५०९.२५६१.९४११७.६९आॅगस्ट४७.७३९.४०६१.९४११९.०७सप्टेंबर४८.९४ ८.७९६१.९४११९.६७आॅक्टोबर४८.१०१६.१५६१.९४१२६.१९नोव्हेंबर५१.९०७.५२०००५९.४२डिसेंबर४४.९९९.७३१२३.८८१७८.६०जानेवारी४६.७६७.१५२८.८६८२.७७फेब्रुवारी५२.१३६.६४०००५८.७७मार्च५०.९९०००१२७.२९१७८.२८एकुण५७४.३९ १०१.९३ ७१३.५१ १३८९.९३