शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे महापालिकेत एका दिवसासाठीही वादग्रस्तच

By admin | Updated: April 8, 2017 01:17 IST

विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास महापालिकेत आलेले पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे काही तासांमध्येच आपली छाप सोडून गेले.

पुणे : विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास महापालिकेत आलेले पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे हे काही तासांमध्येच आपली छाप सोडून गेले. पदाधिकाऱ्यांना निवडणुकीत प्रवेशबंदी करून त्यांनी वाद ओढवून घेतला. सत्ताधारी भाजपाने त्याकडे लक्ष दिले नाही तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र महापौरांचा अवमान झाला असल्याची टीका केली.विभागीय आयुक्तांनी या निवडणुकांसाठी मुंढे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यासाठी शुक्रवारी ते महापालिकेत आले. या निवडणुकीसाठी महापौर, सभागृह नेते, गटनेते आदी पदाधिकारी उपस्थित असतात. फक्त निवडणुकीशी संबंधित समित्यांचे सदस्यच उपस्थित राहतील असा फतवा मुंढे यांनी आधीच काढला होता. तरीही महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी पदाधिकारी नेहमीच उपस्थित असतात, तसे संकेत आहे, असे सांगत त्यांच्या उपस्थितीची परवानगी मागितली.मुंढे यांनी त्याला नकार दिला; मात्र महापौर, उपमहापौर उपस्थित राहू शकतील असे नंतर सांगितले. मग या पदाधिकाऱ्यांच्या बसण्याच्या जागेवरून प्रश्न निर्माण झाला. महापौर व उपमहापौर पीठासीन अधिकाऱ्यांच्या शेजारी बसतील असे मुंढे यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिल्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी त्याला नकार दिला. सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी, आमचे काही म्हणणे नाही, आम्ही सभागृहातच येणार नाही असे सांगितले. मात्र, त्याच वेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी हा महापौरांचा अपमान आहे अशी भूमिका घेतली. मात्र, विरोधकांनी सर्व समित्यांची निवडणूक लढवली. (प्रतिनिधी) >तुम्हीच मुंढे कशावरून?तुकाराम मुंढे यांनी नगरसेवकांना ओळखपत्र दाखविण्यास सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेचे अविनाश साळवे यांनी सभागृहातच मुंढे यांना ‘तुम्हीच मुंढे कशावरून’ असा प्रश्न विचारला. मुंढे यांनी त्यांना शांतपणे स्वत:चे छायाचित्र असलेले ओळखपत्र दाखवले. महापालिकेची प्रथा, परंपरा, संकेत समजावून न घेता मुंढे वागले. यापूर्वीच्या निवडणुकीत कधीही असे झाले नव्हते. भाजपाला त्याचे काहीही वाटत नाही हेच आमच्यासाठी खेदजनक आहे. महापौर व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये असा नियम असेल, तर मुंढे यांनी तो दाखवावा. -चेतन तुपे, विरोधी पक्षनेते>सर्व समित्यांमध्ये आमचाच विजय होणार होता. त्यांनी नियमांचे पालन केले. आमचे त्याविषयी काहीही म्हणणे नाही. महापौरांचा अवमान वगैरे काही नाही. नियम होता, तो त्यांनी सांगितला, आम्ही ते ऐकले. यापेक्षा वेगळे काहीही झालेले नाही. - श्रीनाथ भिमाले, सभागृह नेते>कचरा संकलन गाड्यांवरील वाहक घेतले पीएमपीने काढूनपुणे : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वाहनांसाठी पीएमपीच्या नियुक्त करण्यात आलेल्या तब्बल ८३ चालकांना तातडीने शनिवारपासून (दि.८) पुन्हा पीएमपीमध्ये रुजू होण्याचे आदेश पीएमपीएमएलचे व्यवस्थाकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. मुंढे यांनी महापालिकेला दिलेला हा पहिलाच मोठा दणका असून, शहरातील कचरा संकलनाचे काम यामुळे ठप्प होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या व्हेईकल डेपोकडे कचरा संकलनासाठी ५४६ गाड्या आहेत. त्यावर हे चालक दोन शिफ्टमध्ये काम करतात. त्यात काही ठेकेदारांकडून घेतलेले चालक असून, ८३ चालक पीएमपीएचे आहेत. व्हेईकल डेपोकडे चालकांची कमतरता असल्याने पीएमपीकडे जादा असलेल्या चालकांना कचरागाड्यांसाठी वापरले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हे चालक महापालिकेच्या सेवेत आहेत. मात्र या सर्व कर्मचाऱ्यांचा पगार पीएमपी करते. त्यामुळे मुंढे यांनी या सर्व व्हेईकल डेपोकडील चालकांना तातडीने पीएमपीकडे रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, त्याचा परिणाम थेट कचरा संकलनावर होणार आहे.