शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे यांचा लेट लतिफांना दणका

By admin | Updated: March 31, 2017 03:32 IST

पीएमपीएमएलचे नूतन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पहिला दणका लेट लतिफांना दिला असून

पुणे : पीएमपीएमएलचे नूतन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पहिला दणका लेट लतिफांना दिला असून, उशिरा कामावर आलेल्या तब्बल १२० कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश दिले आहेत. पीएमपीचे कर्मचारी फक्त सात तास काम करत असल्याचे मुंढे यांनी निदर्शनास आणले. त्यावर लगेचच बैठक घेऊन कामाच्या वेळेत एक तास वाढ करत सकाळी पावणेदहा ते संध्याकाळी पावणेसहा अशी कार्यालयीन कामकाजाची वेळ ठरवून दिली. तसेच, वेळेत कामावर हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचीही तंबीही त्यांनी दिली होती. त्यानुसार सर्व प्रशासकीय कार्यालये, डेपो, सेंट्रल वर्कशॉपमधील ११७ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई करत मुंढे यांनी धडाकेबाज कामाचा प्रत्यय दिला. पीएमपीएमलची स्थिती समजून घेण्यासाठी मुंढे यांनी गुरुवारी दिवसभर बैठकांचा धडाका लावला होता. कंपनीतील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी फायली घेऊन धावपळ करताना दिसत होते. पीएमपीच्या अनेक बस सध्या नादुरुस्त आहेत. त्यांचा आढावाही मुंढे यांनी घेतला. तसेच, त्यातील १०० बसेसच्या दुरुस्तीसाठी त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पुढील १५ दिवसांत त्या बस रस्त्यावर आल्या पाहिजेत, अशा सूचना दिल्या.एक कोटी रुपयांचा निधी पीएमपीच्या ताफ्यातील बंद असलेल्या गाड्या त्वरित सुरू व्हाव्यात, यासाठी तुकाराम मुंढे यांनी पावले उचलली आहेत. पीएमपीच्या बंद पडलेल्या १०० गाड्या दुरुस्तीसाठी एक कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीद्वारे गाड्यांचे सुटे भाग खरेदी तसेच दुरुस्तीचे काम होणार असून, येत्या १५ दिवसांत या बंद गाड्या मार्गावर आणण्यात येणार आहेत. शिस्तीची कर्मचाऱ्यांना धास्ती तुकाराम मुंढे यांनी पीएमपीची सूत्रे स्वीकारताच कर्मचाऱ्यांसाठी कामासंदर्भात आचारसंहिता आखून दिली. यामध्ये कामाच्या वेळेपासून गणवेश, केस, दाढी, टापटीपपणा या गोष्टींचा समावेश आहे. त्यांच्या शिस्तीचा धसका घेऊन गुरुवारी सर्व कर्मचारी ओळखपत्र, गणवेश याबाबत सतर्क असल्याचे दिसून आले.