शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

मुंडेंच्या मृत्यूची चौकशी भाजपाच्याच हातात

By admin | Updated: June 5, 2014 22:43 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे अधिकार केंद्र शासनालाच आहेत.

मुंडेंच्या मृत्यूची चौकशी भाजपाच्याच हातातराज्य सरकारवरील रोष अनाठायी विश्वास पाटील/कोल्हापूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे अधिकार केंद्र शासनालाच आहेत. सध्या केंद्रात भाजपाचेच सरकार आहे. त्यामुळे त्यांनी मनात आणले तर या चौकशीचा निर्णय चुटकीसरसा होऊ शकतो, परंतु त्यासाठी अंत्यंसंस्कारासाठी आलेल्या नेत्यांच्या गाडीवर दगडफेक करण्याची गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.एखाद्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायची झाल्यास त्यासाठी हे प्रकरण कोणत्या राज्यात घडले त्या राज्याची सहमती अत्यावश्यक असते. त्यांनी अशी सहमती दिल्यासच केंद्र शासन सीबीआय चौकशीचा निर्णय घेवू शकते. मुंडे यांचा अपघाती मृत्यू दिल्ली विमानतळावर जाताना झाला. त्याचा तपासही दिल्ली पोलिस करत आहेत. दिल्लीचे गृहखाते केंद्र शासनाकडे आहे. मुंडे यांच्या अपघातामागे काही घातपात आहे असे वाटत असल्यास केंद्र सरकार या प्रकरणाची सीबीआय चौकशी करू शकते़ ही वस्तुस्थिती असताना राज्य सरकारवर व त्यातही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गाडीवर दगडफेकीचा प्रकार घडला, ते चुकीचेच होते अशी प्रतिक्रिया आता भाजपमधूनही व्यक्त होवू लागली आहे.