शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

मुंडेंचा काँग्रेसप्रवेश मनमोहन यांनी टाळला

By admin | Updated: February 8, 2017 05:36 IST

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेसप्रवेश तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे रोखला गेला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते

मुंबई : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेसप्रवेश तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यामुळे रोखला गेला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.‘एबीपी माझा’शी बोलताना अजित पवार यांनी २०१२-१३मधील आजवर पडद्याआड राहिलेल्या एका राजकीय घडामोडीचा पटच उघड केला. भाजपामध्ये घुसमट होत असल्याने गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात होते. पाशा पटेल, माधुरी मिसाळ, प्रकाश शेंडगे, पंकजा मुंडे असे चार-पाच आमदारही मुंडेंसोबत पक्ष सोडणार होते. मुंडे तेव्हा लोकसभेचे उपनेते होते. उपनेत्याने अशा प्रकारे पक्ष फोडायचा नसतो, असे सांगून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंडेंना पक्षात घेतलं नाही, असा दावा पवार यांनी केला. मुंडे यांनी पक्ष सोडण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज यांनी समजूत घातल्यावर मुंडेंनी निर्णय बदलला, अशी पुस्तीही पवारांनी जोडली. पवारांना पाहून मुंडेंनी वाढदिवस ठरवलागोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांची जन्मतारीख १२ डिसेंबर अशी आहे. याच दिवशी ते आपला वाढदिवस साजरा करीत असत. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचे समजेल, असे सांगत गोपीनाथ मुंडे यांची खरी जन्मतारीख त्यांच्या आई-वडिलांना ठाऊक नव्हती. १९८०च्या सुमारास पवारांभोवती वलय होते. त्यांचा वाढदिवस राज्यभरात उत्साहाने साजरा केला जातो, हे पाहूनच मुंडेंचा वाढदिवस १२ डिसेंबरला जाहीर करण्यात आला, ही माहिती खुद्द धनंजय मुंडेंनी दिली आहे, असा दावाही पवार यांनी केला.