शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

जलपर्यटनाकडे मुंबईकरांचा वाढतोय कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 07:10 IST

मुंबई बंदर : दहा महिन्यांत दोन लाख ३२ हजार जणांचा क्रुझद्वारे जलप्रवास

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जलपर्यटनाच्या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून, मुंबई बंदरात येणाऱ्या विविध अत्याधुनिक जहाजांमुळे मुंबईकरांचा जलप्रवासाला जाण्याचा कल दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जहाजांद्वारे जलपर्यटनासाठी दोन लाख ३२ हजार प्रवाशांनी मुंबई बंदरातून प्रवास केला आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यांनी मुंबई बंदरातून क्रुझ पर्यटनाला चालना मिळावी व जलपर्यटनाच्या माध्यमातून पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी प्रयत्न केले आहेत. या वर्षी २५५ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासी जहाजांचे मुंबई बंदरात आगमन झाले होते व त्यांनी येथून पुढील प्रवासाला प्रारंभ केला. २०१७ मध्ये ही संख्या ४६ होती व २०१८ मध्ये त्यामध्ये भर पडून १०६ जहाजे मुंबईत आली होती. क्रुझद्वारे पर्यटनाला आलेल्या व येथून जाणाºया प्रवाशांची संख्या २०१७च्या ५६ हजारांवरून २०१८ मध्ये ८७ हजारांवर गेली होती. सातत्याने या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचे काम वेगात सुरू असून, येत्या दोन वर्षांत त्याचे काम पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.पुढील आठवड्यात मुंबई ते सुरत जहाज सेवामुंबई ते सूरत जाण्यासाठी नवीन जहाज सेवा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. सध्या मुंबई ते गोवा मार्गावर जहाज सेवा उपलब्ध असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुंबई सुरत मार्गावर जहाज सेवा सुरू करण्यात येणार आहे. गोवाला जाणारी जहाजे सध्या भाऊचा धक्का येथील डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनल येथून सुटतात, तर सुरत जाणारे जहाज वांद्रे वरळी सी लिंक येथून सुटेल व दुसºया दिवशी सुरतजवळील हजिरा बंदरात पोहोचेल.५८ हजार प्रवाशांनी केला आंतरराष्ट्रीय प्रवासजलपर्यटन करणाºया अडीच लाख प्रवाशांमध्ये ५८ हजार आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा समावेश आहे. २०१५-१६ मध्ये ही संख्या ३८ हजार होती. देशभरातील मुंबई, चेन्नई, कोचिन, नवीन मंगळुरू व मार्मागोवा या बंदरावर १२८ आंतरराष्ट्रीय जहाजे आली होती. यंदा त्यामध्ये भर पडून १५७ आंतरराष्ट्रीय जहाजांचे आगमन झाले.येत्या काळात १० लाख जणांचा जलप्रवास!मुंबई पोर्ट ट्रस्टने जहाज प्रवासाला चालना मिळण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याने या सेवांमध्ये वाढ होत आहेत. २०२५पर्यंत मुंबईत १ हजार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जहाजे येतील व त्याद्वारे १० लाख जण प्रवास करतील, असा विश्वास अधिकाºयांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई