शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

'वादळी लाटांच्या तडाख्यातून कोस्टल रोडमुळे मुंबईचा बचाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 02:33 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : वादळी लाटा, त्सुनामीसारख्या तडाख्यांपासून कोस्टल रोड शहरांचे रक्षण करण्याचे काम करतात. त्यादृष्टीनेच जगभरात नव तंत्रज्ञानाचा वापर करत कोस्टल रोडची निर्मिती केली जाते. मुंबईतील कोस्टल रोडही वादळी लाटांपासून शहराचे रक्षण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत व्यक्त केला.कोस्टल रोड प्रकल्पामुळे बाधित कोळी बांधवांच्या पुनर्वसनाबाबत काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या विद्या चव्हाण यांनी समुद्राच्या लाटांच्या तडाख्याचा कोस्टल रोडवर काही परिणाम होईल का, असा सवाल उपस्थित केला. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. कोस्टल रोड हा शहराचे संरक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावेल असे मुख्यमंत्री म्हणाले. नेदरलँडचे प्रधानमंत्री भारत भेटीवर आले असता त्यांनी कोस्टल रोडबाबत सादरीकरण दिले होते. मुंबईतील कोस्टल रोडबाबत राज्य सरकारने त्यांच्याशी करार करावा, अशी त्यांची अपेक्षा होती. समुद्राच्या उंचच्या उंच लाटा थांबवण्यासाठी कोस्टलच्या रोडच्या पलीकडे नवीन तंत्रज्ञान वापरून बंधारे बांधता येऊ शकतात. त्यामुळे कोस्टल रोड भविष्यात वादळी वा-यांपासून तसेच सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यापासून शहराचे संरक्षण करू शकेल असे नेदरँडच्या पंतप्रधानांनी त्यावेळी सांगितले होते, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोस्टल रोडमुळे वरळी आदी भागातील पदपथ काही प्रमाणात तोडावे लागले. कोस्टल रोड तयार करताना आताचे रस्ते आणि कोस्टल रोड यांमध्ये मोठी जागा सोडण्यात येईल.केंद्र सरकारने या जागेत कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करण्याची अट ठेवली आहे. त्यानुसार सीआरझेड लाईनला कुठल्याही प्रकारचा धक्का लावण्यात येणार नाही. या जागेत कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले जाणार नाही. या जागेत हिरवळ तयार करण्यात येईल. त्यामुळे मुंबईला नवे फुफ्फुस मिळेल. - देवेंद्र फडणवीस

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस