शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
4
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
5
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
6
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
7
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
8
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
9
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
10
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
11
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
12
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
13
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
14
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
15
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
16
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
17
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
18
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
20
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...

मुंबईकरांसाठी पहिलं तरंगतं हॉटेल

By admin | Updated: March 12, 2017 15:16 IST

गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातही पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत पहिल्या तरंगत्या हॉटेलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - गोव्याप्रमाणेच महाराष्ट्रातही पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईत पहिल्या तरंगत्या हॉटेलचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. मुंबईतल्या तरंगत्या हॉटेलमुळे पर्यटकांना समुद्राची सफर करता करता मेजवानीचाही आनंद घेता येणार आहे. वांद्रे रेक्लमेशनजवळ ए. बी. सेलेस्टियन या खासगी कंपनीनं हे हॉटेल सुरू केलं असून, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, डब्ल्यू बी इंटरनॅशनल कन्सल्टंट्स आणि एबी यांच्या मदतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या तरंगत्या हॉटेलमधून अथांग समुद्राचं नयनरम्य दर्शन होणार असून, समुद्रातून मुंबईची भव्यताही पाहता येणार आहे. तब्बल 175 कोटी रुपयांचे तरंगते हॉटेल (जहाज) मुंबईतील समुद्रात अवतरलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मुंबईत येताच गेट वे आॅफ इंडिया, म्युझियम, हेरिटेज वास्तू, हॉटेल, चौपाट्या तसेच धार्मिक स्थळांसह अनेक ठिकाणांना भेटी देतात. मोठ्या संख्येने येणारे पर्यटक पाहता एमटीडीसीकडून मुंबईतील पर्यटनस्थळांना नवा लूक देण्यावर भर दिला जात आहे. चौपाट्यांचा विकास करण्याचा बिग बजेट प्रकल्प हाती असतानाच मुंबईतील समुद्रात तरंगणारे हॉटेल मुंबईकर आणि पर्यटकांसाठी एमटीडीसीनं खुले केले आहे. (मुंबईजवळ 175 कोटींचे तरंगते हॉटेल)तत्पूर्वी मुंबईतील वरळी येथील समुद्रात मागील वर्षीही एका खासगी कंपनीच्या साहाय्याने तीनमजली तरंगणारे हॉटेल सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र एक महिना ही सेवा झाल्यानंतर ती बंद करण्यात आली. मात्र वरळी येथील समुद्रात मागील वर्षी सुरू करण्यात आलेली सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे एमटीडीसीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.