शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मुंबईतील सर्वात मोठे 55 सीटर अत्याधुनिक दुमजली जम्बो शौचालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 22:31 IST

ज्वालामुखीच्या उद्रेकातून सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या २०० फूट उंचीच्या बेसाल्ट  टेकडीसाठी प्रसिद्ध असलेली अंधेरी पश्चिन  गिल्बर्ट हिल येथील झोपडपट्टी राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्वात मोठे 55 सीटर पहिले दुमजली जंबो शौचालय उभे केले आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : ज्वालामुखीच्या उद्रेकातून सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी तयार झालेल्या २०० फूट उंचीच्या बेसाल्ट टेकडीसाठी प्रसिद्ध असलेली अंधेरी पश्चिन  गिल्बर्ट हिल येथील झोपडपट्टी राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील सर्वात मोठे 55 सीटर पहिले दुमजली जंबो शौचालय उभे केले आहे. त्यामुळे हा परिसर आता हागवणदारीमुक्त झाला आहे. याठिकाणी इंग्लिश,भारतीय शोचकूप आणि अपंगांसाठी विशेष सुविधा या ठिकाणी करण्यात आली या  55 शौचकूप अशा या अत्याधुनिक शौचालयामध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन तसेच वापरलेले सॅनिटरी पॅड बर्निंग मशीन बसवण्यात आले आहे.या शौचालयाचा नुकताच लोकार्पण सोहळा माजी केंद्रिय मंत्री गुरूदास कामत यांच्या हस्ते करण्यात आला.

 काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका मेहर मोहसीन हैदर यांनी शौचालयाची संकल्पना पालिका प्रशासनाकडे मांडली. त्या म्हणाल्या की, माझ्या वॉर्ड क्रमांक ६६ ची लोकसंख्या सुमारे १ लाख इतकी आहे. त्यापैकी ६५ हजार नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांच्या सोयीसाठी आम्ही अशाप्रकारची ११ शौचालये बांधली आहेत.या शौचालयाचा वरचा मजला हा पुरुषांसाठी तर खालील मजला स्त्रियांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेने २०१८ मध्ये मुंबई मध्ये १८ हजार ८८१ शौचकुपांच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरु केली असून महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रशासनाला मान्यता दिली होती. रुपये ३७६ कोटींचा निधी खर्च अपेक्षित आहे. या अंतर्गत अनेक एकमजली, दुमजली आणि तीमजली शौचालये बांधली जाणार आहेत अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. 

यावेळी माजी नगरसेवक मोहसिन हैदर (परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर, पालिका उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन विजय बालमवार,सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड,साहाय्यक अभियंता-परिरक्षण उमेश बोडके आणि स्थानिक नागरिक  यावेळी मोठया संख्येने हजर होते. 

या शौचालयामुळे हा परिसर हागणदारीमुक्त होणार असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेने केला आहे.प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की ''स्लम सॅनिटेशन कार्यक्रमांतर्गत या शौचालयासाठी १.२ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. या शौचालयाच्या वापरासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसून एखाद्या कुटुंबाला याचा लाभ घ्यायचा असेल तर २५-३० रुपये आकारण्यात येतील. या शौचालयाची स्वच्छता तसेच देखभालीसाठी एखाद्या संस्थेला काम देण्यात येईल.

टॅग्स :Mumbaiमुंबई