शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ढगाळ राहणार; मराठवाड्यासह विदर्भाला पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 06:01 IST

मुंबईची आर्द्रता शुक्रवारप्रमाणेच शनिवारीही ९४ टक्के एवढी नोंदविण्यात आली असून, कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर आहे.

मुंबई : मुंबईची आर्द्रता शुक्रवारप्रमाणेच शनिवारीही ९४ टक्के एवढी नोंदविण्यात आली असून, कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसवर आहे. अशाच काहीशा बदलत्या तापमानामुळे मुंबईकरांचा ‘ताप’ वाढतच असून, उकाड्याने मुंबईकर त्रासले आहेत. त्यातच रविवारसह सोमवारीही मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवामान अंशत: ढगाळ नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून, विदर्भासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे.मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडेच्७ ते ९ - विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.च्१० एप्रिल - मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील.शनिवारचे शहरांचे कमाल तापमान(अंश सेल्सिअसमध्ये)अकोला ४२.६, अमरावती ४३.२, औरंगाबाद ३९.८, बीड ४१.५, बुलडाणा ३९.८, चंद्रपूर ४३, गोंदिया ४०.४, जेऊर ४१, मालेगाव ४१.२, सातांक्रूझ ३३, नागपूर ४३, नांदेड ४२.५, उस्मानाबाद ३८.६, परभणी ४२.९, पुणे ३९.१, सांगली ३९.२, सातारा ३८.७, सोलापूर ४०.९, वर्धा ४३.४, यवतमाळ ४१.५