शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

जागतिक दर्जाचे विद्यार्थी घडविण्यासाठी पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:33 IST

Mumbai University: उत्कृष्टतेला प्राधान्य देत मुंबई विद्यापीठाचा २०२५-२६ या वित्तीय वर्षाचा ९६८ कोटींचा अर्थसंकल्प नुकताच अधिसभेत मंजूर झाला. या अर्थसंकल्पात संशोधन आणि नावीन्यपूर्णतेला प्राधान्य दिले असून, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.

- प्रा. रवींद्र कुलकर्णी (कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

उत्कृष्टतेला प्राधान्य देत मुंबई विद्यापीठाचा २०२५-२६ या वित्तीय वर्षाचा ९६८ कोटींचा अर्थसंकल्प नुकताच अधिसभेत मंजूर झाला. या अर्थसंकल्पात संशोधन आणि नावीन्यपूर्णतेला प्राधान्य दिले असून, उच्च शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण आणि वैश्विक नागरिकत्व शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थी साहाय्य आणि प्रगती उपक्रम, माजी विद्यार्थी कनेक्ट आणि विद्यापीठ-औद्योगिक साहचर्य यासह शैक्षणिक आणि गव्हर्नस उत्कृष्टता उपक्रमांसाठी भरीव तरतूद केली आहे.

नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहनयंदाच्या अर्थसंकल्पात विविध नावीन्यपूर्ण योजनांसह अनेक विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, प्रा. बाळ आपटे दालन आणि सभागृह, स्कूल ऑफ लँग्वेजेस इमारत दुसरा टप्पा, अवेस्ता पहलवी अभ्यास केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह दुसरा टप्पा, मुलींचे वसतिगृह, वेंगुर्ले , वेंगुर्ले येथील सागरी अध्ययन केंद्र आणि तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवासी संकुल व सामुदायिक सभागृह अशा विकासकामांना प्राधान्य देत १३५ कोटींची तरतूद केली आहे.

शैक्षणिक उत्कृष्टता शैक्षणिक वर्गवारीतील सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, विद्यापीठ विभाग रैंकिंग, शैक्षणिक ऑडिट पोर्टल आणि रैंकिंग फ्रेमवर्क, प्रतिष्ठित प्राध्यापकांची व्याख्याने, कुलगुरू योजना, ई-सामग्री विकास आणि महा-स्वयमसाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, राज्य आणि राष्ट्रीय आंतर-विद्यापीठांशी सहयोग आणि संबंधांसाठी संयुक्त संशोधन कार्यक्रम, द्विनिंग/जॉइंट/ड्युअल डिग्री प्रोग्राम, स्कूल कनेक्ट आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी, भारतीय ज्ञान प्रणाली सेल, अध्यापन-शिक्षण-मूल्यांकनामध्ये एआय साहाय्य प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा वापर अशा शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समर्थन आणि लिंकेजसाठी केंद्र, परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आणि नावनोंदणीसाठी सिंगल विंडो सिस्टम अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. गुणवत्ता, सर्वसमावेशकता आणि उत्कृष्टतेला प्राधान्य देण्यासाठी विद्यापीठाने ३५ कोटींची भरीव तरतूद केली आहे. जागतिक दर्जाचे विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठाचा मास्टर प्लॅन, कार्बन न्यूट्रल ग्रीन कॅम्पस उपक्रम, फोर्ट, विद्यानगरी व इतर उपपरिसरांतील पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प अधिसभेने मंजूर केला.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ