ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. कळवा - मुंब्रा दरम्यान धीम्या मार्गावरील रेल्वेच्या रुळाला तडे गेल्याने कल्याणकडे जाणारी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्यावेळी ही घटना घडल्यामुळे अनेक प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कळवा - मुंब्रा दरम्यान धीम्या मार्गावरील रेल्वेच्या रुळाला तडे गेल्याने कल्याणकडे जाणारी रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी रेल्वे प्रशासन पोहचले असून वाहतूक पुर्ववत करण्याचे कामकाज सुरु आहे.
याच मार्गावर काल कसा-याला जाणा-या लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्याची घटना घडली होती. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.