शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मुंबईसह उपनगरात जोर‘धार’

By admin | Updated: July 15, 2017 05:32 IST

मान्सून सक्रिय झाल्यानंतर गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी आपला जोर कायम ठेवला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मान्सून सक्रिय झाल्यानंतर गुरुवारी पडलेल्या पावसाने शुक्रवारी आपला जोर कायम ठेवला. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी पडलेल्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार पावसादरम्यान कुठेही पाणी साचले नसले तरीदेखील पडझड कायम होती. सलग सुरू राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळीच कुलाबा, फोर्ट, भायखळा, लालबाग, परळ, माहीम, दादर आणि सायन परिसरात तर पूर्व उपनगरात भांडुप, मुलुंडसह घाटकोपर आणि कुर्ला येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम उपनगरात अंधेरी, पार्ले आणि गोरेगाव येथेही पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. विशेषत: वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात पावसाचा अधिक जोर असल्याचे चित्र होते. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी बरसलेल्या पावसाने दुपारी काही काळ विश्रांती घेतली. मात्र पुन्हा सायंकाळसह रात्री जोर पकडलेल्या मान्सूनधारांनी मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली.दरम्यान, कुर्ला पश्चिमेकडील सफेद पूल येथे घराची भिंत पडून सहा जण जखमी झाले. यापैकी पाच जणांना पॅरामाउंट या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. ३० ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम राहील. पुढील ४८ तास मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. >रायगड जिल्ह्यात संततधाररायगड जिल्ह्यात संततधार पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद पेण येथे २४० मि.मी. झाली आहे. उर्वरित ठिकाणी कर्जत २३६.२० मि.मी., सुधागड १५५.३३, खालापूर १४४, पनवेल ८९.२०, माणगाव ९६, पोलादपूर ७८, रोहा ७३, महाड ७२, अलिबाग ३८, मुरुड २९, उरण ४४, तळा ४२, म्हसळा १५.४०, श्रीवर्धन १४ आणि गिरिस्थान माथेरान येथे १९९.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.>मोडकसागर धरणामुळे पालघरच्या ४२ गावांना धोक्याचा इशाराठाणे : जिल्ह्यातील मोडकसागर या धरणाने धोक्याची पातळी ओलांडली असून, खर्डी नदी परिसरात असलेल्या गावांना धोक्याचा व सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीवर मुंबई महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. अवघ्या १८ तासांत या धरणाची पातळी झपाट्याने वाढल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत काढलेल्या इशारापत्रकात धरणाखालील पालघर जिल्ह्यातील ४२ गावांना हा धोक्याचा इशारा देऊन सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. गेल्या २४ तासांत ठाणे जिल्ह्यात २४७.४० मिमी पाऊस झाला आहे. यामुळे रुंदे येथील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने १० ते १२ गावांचा टिटवाळा शहराशी थेट संपर्क तुटला.>पावसाची नोंदमागील २४ तासांत कुलाबा आणि सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३०.८, २६.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरात २०.७५, पूर्व उपनगरांत ३५.०२ आणि पश्चिम उपनगरांत २२.१२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.