शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

Shraddha Walker Murder Case: श्रद्धा हत्याकांडप्रकरणी मुंबई पोलीस अडचणीत? अधिकाऱ्यांच्याच चौकशीचे आदेश निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 11:08 IST

तक्रारीनंतरही चौकशीत बेजबाबदारपणा दाखविल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर माझी मुलगी वाचली असती, असा आरोप श्रद्धा वालकरचे वडील विकास यांनी पत्रकार परिषद घेऊन केल्यानंतर तपासात आणि चौकशीत बेजबाबदारपणा दाखवत दिरंगाई करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे तुळींज आणि माणिकपूर ठाण्यातील तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

श्रद्धाने तक्रार देऊनही त्याची दखल न घेतल्याबद्दल तिच्या वडिलांनी पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशीबाबत आदेश काढल्याचे सूत्रांकडून कळते. आफताब माझा गळा दाबून मला ठार करेल, अशी तक्रार श्रद्धाने पोलिस ठाण्यात केली होती. मात्र त्याची वेळीच दखल घेतली गेली नाही.  आरोपी आफताब पुनावाला याने मारहाण केल्यानंतर श्रद्धाने तुळींज आणि माणिकपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती; परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. श्रद्धाशी तेव्हाच नीट संवाद साधून तिला बोलते केले असते, आफताबला पोलिस ठाण्यात बोलावून समज दिली असती तरी त्याच्या कृत्याला आळा बसला असता, अशी तिच्या कुटुंबीयांची भावना आहे.  हा मुद्दा श्रद्धाचे वडील विकास यांनी पोलिसांच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले. तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. 

तक्रारच मागे घेतली, तर मग पोलिस दोषी कसे?n श्रद्धाने जेव्हा तुळींज पोलिस ठाण्यात मारहाणीची तक्रार केली होती. त्यावेळी तिला वैद्यकीय तपासणी करून येण्यास सांगितले; पण ती आलीच नाही. तिला अनेक वेळा तुळींज पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यावर ती आली. n पण त्यावेळी तिने आफताबबाबत काहीही तक्रार नसल्याचा जवाब पोलिसांना दिला आहे. मूळ तक्रारच मागे घेतल्याने पोलिसांना तपास करता आला नाही. तिच्या वडिलांनी पोलिसांवर केलेल्या आरोपात तथ्य नाही. n त्यावेळी पोलिसांनी योग्य चौकशी आणि तपास केल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरMumbai policeमुंबई पोलीस