शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नांदेड अवघ्या ४५ मिनिटांत, चार वर्षांनंतर सेवेत; कलाकारांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 02:40 IST

मुंबई-नांदेड विमान सेवेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई-नांदेड हे अंतर हवाई मार्गे अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई-नांदेड विमान सेवेला गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबई-नांदेड हे अंतर हवाई मार्गे अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे सर्वसामान्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. मुंबई-नांदेड-मुंबई ही विमानसेवा खासगी विमान कंपनीकडून देण्यात येत आहे.देशांतर्गत विमान सेवेला चालना मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडान योजना हाती घेतली. मुंबई-नांदेड पहिल्या विमान सेवेतून अभिनेत्यांसह चित्रपट दिग्दर्शकांनी लाभ घेतला. यात ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, अभिनेता-दिग्दर्शक राकेश रोशन, अभिनेता शक्ती कपूर, अभिनेता आदित्य पांचोली यांचा समावेश आहे.उडान योजनेतर्गंत मुंबई-शिर्डी आणि शिर्डी-हैद्रराबाद हवाई मार्गावर विमान सेवा सुरु करण्यात आली आहे. मुंबई-नांदेड विमान प्रवासासाठी अडीच हजार ते तीन हजार रुपयांदरम्यान आहे. या सेवेमुळे सर्वसामान्यांचे विमान प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे़विमानांंचे वेळापत्रक-मुंबईहून दुपारी १२़४५ वाजता सुटणारे विमान दुपारी २ वाजून २० मिनिटांनी नांदेडमध्ये पोहोचेल़ नांदेडहून सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी सुटणारे विमान मुंबईत दुपारी १२ वाजून १० मिनिटास पोहोचेल़ रनवेच्या दुरूस्तीसाठी बंद असलेली नांदेड-हैदराबाद विमानसेवाही १६ नोव्हेंबरपासूनच सुरू झाली. हैदराबाद येथून सकाळी ९ वाजता निघणारे विमान सकाळी १० वाजता नांदेडात तर नांदेडहून दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटणारे विमान दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी हैदराबाद येथे पोहोचणार आहे.नांदेड : केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेअंतर्गत घोषित करण्यात आलेल्या नांदेड-मुंबई आणि नांदेड- हैदराबाद टू-जेट विमानसेवा तब्बल चार वर्षांनंतर पूर्ववत झाली़

टॅग्स :NandedनांदेडMumbaiमुंबई