शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai: ‘त्या’ विद्यार्थ्यांना मराठीचे गुण आता श्रेणी पद्धतीने, सरकारचा दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 11:43 IST

Marathi: राज्य शिक्षण मंडळवगळता आठवी, नववी आणि दहावीत शिकणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसई इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांचे मराठीचे मूल्यांकन करताना यापुढे श्रेणी स्वरुपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने बुधवारी जाहीर केला.

मुंबई : राज्य शिक्षण मंडळवगळता आठवी, नववी आणि दहावीत शिकणाऱ्या सीबीएसई आणि आयसीएसई इतर मंडळांच्या विद्यार्थ्यांचे मराठीचे मूल्यांकन करताना यापुढे श्रेणी स्वरुपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने बुधवारी जाहीर केला. मराठीच्या मूल्यांकनाचा समावेश इतर परीक्षा मंडळांच्या इतर विषयांच्या एकत्रित मूल्यांकनामध्ये करण्यात येऊ नये, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. 

राज्य सरकारतर्फे १ जून २०२० रोजी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण मंडळांच्या शासकीय आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सक्ती करण्यात आली होती. या निर्णयानुसार सीबीएसई, आयसीएसई, आयबी व अन्य मंडळांच्या सर्व शाळांसाठी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याची सूचना करण्यात आली होती. मात्र, कोविडच्या कालावधीत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्याने अनेक अडचणी आल्या. या काळात नियमित शाळा सुरू नसल्याने त्याचा इतर मंडळातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसला. त्यातच इतर परीक्षा मंडळांच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय नवीन असल्याने या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यासंदर्भात तक्रार केली होती. 

२०२३-२४ पासून पुढील तीन वर्षांपर्यंत इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मराठी विषयाचे मूल्यांकन करताना श्रेणी स्वरुपात करण्याची सूचना केली आहे.

टॅग्स :marathiमराठी